close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

मालदीवमध्ये प्रियकरासोबत सुट्टीचा आनंद लुटणाऱ्या अभिनेत्रीचे फोटो व्हायरल

Sep 16, 2019, 13:43 PM IST
1/6

मालदीवमध्ये प्रियकरासोबत सुट्टीचा आनंद लुटणाऱ्या अभिनेत्रीचे फोटो व्हायरल

कामाच्या व्यग्र वेळापत्रकातून वेळ काढत सेलिब्रिटी त्यांच्या कुटुंबाला आणि प्रियजनांना कायमच प्राधान्य देत असतात. संधी मिळताच मग ही मंडळी गर्दी, झगमगाट, कॅमेऱ्यांच्या रोखलेल्या नजरा या साऱ्यापासून दूर जातात. सध्या अशीच एक बी- टाऊन सुंदरी सुट्टीचा आनंद घेत असल्याचं तिने शेअर केलेले फोटो पाहून लक्षात येत आहे. सोशल मीडियावर तिच्या फोटोंची चर्चा आहे कारण, तिला एका खास व्यक्तीची साथही लाभली आहे. ही खास व्यक्ती म्हणजे तिचा प्रियकर.... (छाया सौजन्य- इन्स्टाग्राम)

2/6

मालदीवमध्ये प्रियकरासोबत सुट्टीचा आनंद लुटणाऱ्या अभिनेत्रीचे फोटो व्हायरल

प्रियकराच्या साथीने मालदीवमध्ये सुट्टीचा आनंद लुटणारी ही अभिनेत्री आहे, सुष्मिता सेन. तिने इन्स्टाग्रामवर नुकतेच एका प्रेक्षणीय आणि सुरेख अशा स्थळाचे फोटो शेअर केले आहेत. सोशल मीडियावर शेअर करण्यात आलेल्या या फोटोंमध्ये ती अतिशय सुरेख दिसत आहे. (छाया सौजन्य- इन्स्टाग्राम)

3/6

मालदीवमध्ये प्रियकरासोबत सुट्टीचा आनंद लुटणाऱ्या अभिनेत्रीचे फोटो व्हायरल

अर्थात तिच्या आनंदाचं कारणही तसंच आहे. खासगी आयुष्यातील काही अडचणी, प्रेमभंग, कलाविश्वातील पुनरागमन या साऱ्या गोष्टी हाताळत अखेर रोमनच्या रुपात सुष्मिताला स्थैर्य लाभल्याचं तिने एका मुलाखतीत सांगितलं होतं. (छाया सौजन्य- इन्स्टाग्राम)

4/6

मालदीवमध्ये प्रियकरासोबत सुट्टीचा आनंद लुटणाऱ्या अभिनेत्रीचे फोटो व्हायरल

रोमनसोबतच्या नात्याविषयी काही महिन्यांपूर्वी ग्वाही दिल्यानंतर अखेर सुष्मिताने साऱ्या जगासमोर त्याच्यासोबतच्या नात्यातील काही खास क्षणांविषयी सांगितलं. (छाया सौजन्य- इन्स्टाग्राम)

5/6

मालदीवमध्ये प्रियकरासोबत सुट्टीचा आनंद लुटणाऱ्या अभिनेत्रीचे फोटो व्हायरल

इतकच नव्हे, तर रोमन आता तिच्या कुटुंबाचाच एक भाग झाला आहे. सुष्मिता आणि तिच्या मुली जिथे कुठे जातात, त्या ठिकाणी त्यांना रोमनचीही साथ असते. तिच्या व्यायामापासून ते अगदी विविध कौटुंबीक समारंभांना हजेरी लावेपर्यंत सर्वच ठिकाणी रोमनची उपस्थिती पाहायला मिळते. (छाया सौजन्य- इन्स्टाग्राम)

6/6

मालदीवमध्ये प्रियकरासोबत सुट्टीचा आनंद लुटणाऱ्या अभिनेत्रीचे फोटो व्हायरल

सोशल मीडियाच्या माध्यमातून सुरु झालेलं सुष्मिता आणि रोमनचं नातं आता ज्या वळणावर आलं आहे, हे पाहता या नात्यावर लग्नाची मोहोर ते केव्हा उमटवणार याचीच उत्सुकता चाहत्यांना लागली आहे. (छाया सौजन्य- इन्स्टाग्राम)