close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

'या' सेलिब्रिटींचं म्हातारपणही असेल तितकंच सुंदर

Jul 17, 2019, 12:44 PM IST
1/7

'या' सेलिब्रिटींचं म्हातारपणही असेल तितकंच सुंदर

सोशल मीडियावर एखादी गोष्ट किंवा हॅशटॅग ट्रेंडमध्ये आल्यानंतर त्याची सर्वत्र जणू हवाच पाहायला मिळते. गल्लीबोळापासून ते विविध क्षेत्रांपर्यंत चर्चा सुरु होते ती याच ट्रेंडची. कलाविश्वही यापासून दूर नाही. सध्याच्या घडीला असाच एक ट्रेंड सेलिब्रिटी मंडळींमध्ये आकर्षणाचा विषय ठरत आहे. हा ट्रेंड आहे, म्हातारपणीचे फोटो शेअर करण्याचा. (छाया सौजन्य- इन्स्टाग्राम) 

2/7

'या' सेलिब्रिटींचं म्हातारपणही असेल तितकंच सुंदर

एका अॅपच्या सहाय्याने आपण म्हातारपणी कसे दिसू याची झलक पाहण्याची संधी सर्वांनाच मिळत आहे. बेबी फेस प्रमाणेच सेलिब्रिटींचा हा वयोवृद्ध रुपातील अंदाजही चाहत्यांची मनं जिंकत आहे. (छाया सौजन्य- इन्स्टाग्राम) 

3/7

'या' सेलिब्रिटींचं म्हातारपणही असेल तितकंच सुंदर

काही सेलिब्रिटींनी त्यांच्या स्वत:च्याच सोशल मीडिया अकाऊंटवरुन हे फोटो पोस्ट केले आहेत. ज्यामध्ये अभिनेता वरुण धवनचा समावेश आहे. (छाया सौजन्य- इन्स्टाग्राम) 

4/7

'या' सेलिब्रिटींचं म्हातारपणही असेल तितकंच सुंदर

अर्जुन कपूरनेही त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन असाच एक लूक शेअर केला आहे. ज्यामध्ये त्याचं म्हातारपणीचं रुप नेमकं कसं असेल, हे पाहायला मिळत आहे. (छाया सौजन्य- इन्स्टाग्राम) 

5/7

'या' सेलिब्रिटींचं म्हातारपणही असेल तितकंच सुंदर

काही सेलिब्रिटींच्या फॅन पेजवरुनही असेच फोटो पोस्ट करण्यात आले आहेत. यामध्ये बी- टाऊनची सर्वात लाडकी जोडी रणवीर सिंग आणि दीपिका पदुकोण यांचाही समावेश आहे. (छाया सौजन्य- इन्स्टाग्राम) 

6/7

'या' सेलिब्रिटींचं म्हातारपणही असेल तितकंच सुंदर

फक्त 'दीप-वीर'च नव्हे, तर अभिनेत्री प्रियांका चोप्रा आणि तिचा पती निक जोनास ही जोडीसुद्धा उतारवयात कशी दिसेल याची झलक दाखवणारा फोटोही सोशल मीडियावर पोस्ट करण्यात आला आहे. (छाया सौजन्य- इन्स्टाग्राम) 

7/7

'या' सेलिब्रिटींचं म्हातारपणही असेल तितकंच सुंदर

प्रियांकाच्या कुटुंबातील आणखी काही व्यक्ती, म्हणजेच निक जोनासचे भाऊसुद्धा या ट्रेंडचा एक भाग झाले आहेत. सेलिब्रिटींच्या या अदा आणि अंदाज पाहता “aged like fine wine” या ओळीचा शब्दश: अर्थ लागत आहे, असं म्हणयला हरकत नाही. (छाया सौजन्य- इन्स्टाग्राम)