Budget Trip: मध्यमवर्गीयांसाठी गुड न्यूज, IRCTC च्या बजेट पॅकेजमध्ये श्रावणात घ्या ज्योतिर्लिंगांचे दर्शन

| Jul 16, 2023, 09:26 AM IST
1/6

Budget Trip: मध्यमवर्गीयांसाठी गुड न्यूज, IRCTC च्या बजेट पॅकेजमध्ये श्रावणात घ्या 7 ज्योतिर्लिंगांचे दर्शन

Budget Trip IRCTCs Har har mahadev Package Visit 7 Jyotirlingas in Shravan

IRCTC Tour Packages: श्रावण महिन्याला हिंदू धर्मात महत्वाचे स्थान आहे. अनेक महत्वाचे सण श्रावणात साजरे केले जातात. तसेच शिवभक्त देखील श्रावणामध्ये भगवान शंकराच्या भक्तीत तल्लीन झालेले असतात. हिंदू पौराणिक मान्यतेनुसार या महिन्याला विशेष महत्त्व आहे. देशभरातील शिवालयांमध्ये श्रावणासाठी विशेष व्यवस्था करण्यात येत आहे. 

2/6

मध्यमवर्गीयांसाठी बजेट ट्रिप

Budget Trip IRCTCs Har har mahadev Package Visit 7 Jyotirlingas in Shravan

मध्यवर्गीय कुटुंब ज्योतिर्लिंगसारख्या देवस्थळी जाण्याचे ठरवतात पण काही ना काही कारण येऊन ते राहून जाते. बऱ्याचदा खर्च खूप होईल या कारणानेदेखील अनेक देवदर्शनाच्या ट्रिप रद्द होतात. दरम्यान आता इंडियन रेल्वे कॅटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन म्हणजेच आयआरसीटीसीने तुमच्यासाठी श्रावण महिन्यात एक अप्रतिम टूर पॅकेज आणले आहे. ज्याद्वारे तुम्ही 7 ज्योतिर्लिंगांचे दर्शन घेऊ शकणार आहात

3/6

हर हर महादेव!

Budget Trip IRCTCs Har har mahadev Package Visit 7 Jyotirlingas in Shravan

तुम्हालाही श्रावण महिन्यात सात ज्योतिर्लिंगाचे दर्शन घ्यायचे असेल तर हे टूर पॅकेज तुमच्यासाठी उत्तम आहे. IRCTC च्या या टूर पॅकेजमध्ये तुम्हाला अनेक उत्तम सुविधा देखील मिळत आहेत. या सहलीत तुम्हाला 12 जगप्रसिद्ध ज्योतिर्लिंगांपैकी 7 ज्योतिर्लिंगांच्या दर्शनाचा लाभ घेता येणार आहे. हर हर महादेव! असे या पॅकेजचे नाव आहे. सात ज्योतिर्लिंग दर्शन यात्रेचे ट्रेन टूर पॅकेज आहे.

4/6

या 7 ज्योतिर्लिंगांचे घेता येईल दर्शन

Budget Trip IRCTCs Har har mahadev Package Visit 7 Jyotirlingas in Shravan

आयआरसीटीसीच्या या 7 ज्योतिर्लिंग यात्रेत पर्यटकांना द्वारका, सोमनाथ, नाशिक, शिर्डी, औरंगाबाद, परळी, परभणी, पुणे आणि केवडिया आदी ठिकाणी नेले जाणार आहे. IRCTC चे हे टूर पॅकेज 11 दिवस आणि 10 रात्रीचे आहे. 

5/6

नाश्ता, जेवणाची सुविधा

Budget Trip IRCTCs Har har mahadev Package Visit 7 Jyotirlingas in Shravan

या टूर पॅकेजमध्ये IRCTC प्रवाशांच्या राहण्याची आणि जेवणाची व्यवस्था करेल. टूर पॅकेजमध्ये पर्यटकांना नाश्ता, दुपारचे जेवण आणि रात्रीच्या जेवणाची सुविधा मिळणार आहे. हा प्रवास 18 जुलै 2023 रोजी सुरू होईल.

6/6

भाडे किती असेल?

Budget Trip IRCTCs Har har mahadev Package Visit 7 Jyotirlingas in Shravan

टूर पॅकेजचे दर श्रेणीनुसार भिन्न असतील. स्लीपरमध्ये प्रवास केल्यास प्रति व्यक्ती १९,३०० रुपये मोजावे लागतील. थर्ड एसीमध्ये प्रवास केल्यास प्रति व्यक्ती ३१,५०० रुपये मोजावे लागतील. तुम्हाला तिकीट बुक करायचे असेल तर तुम्हाला IRCTC वेबसाइटवर जावे लागेल. तिथे तुम्हाला या ट्रिपशी संबंधित सर्व माहिती मिळेल.