मुलुंडमध्ये Railway ने महिलांसाठी उभारलं आलिशान टॉयलेट; Photos पाहून म्हणाल, 'टॉयलेट आहे की मॉल'
Woloo Women Toilet : मुलुंडमध्ये स्वच्छ शौच्छालयची सुरुवात..
महिलांना सार्वजनिक ठिकाणी स्वच्छ शौचालयाची सुविधा उपलब्ध व्हावी यासाठी Woloo वुमन टॉयलेटची सुरुवात झाली आहे. मुंबईतील मुलुंड स्टेशनवर याची सुरुवात झाली आहे. यामध्ये शौच्छालयासोबतच कॉस्मेटिक आयट्मसही मिळणार आहेत.
1/6
मुलुंडमध्ये Railway ने महिलांसाठी उभारलं आलिशान टॉयलेट
प्रवाशांना चांगल्या सुविधा देण्याच्या उद्देशाने भारतीय रेल्वे सातत्याने नवनवीन उपक्रम राबवत आहे. यामध्ये महिला प्रवाशांना उत्तम प्रवासाचा अनुभव देण्यासाठी मुंबईतील मुलुंड स्थानकावर Woloo महिला पावडर रूमचे उद्घाटन करण्यात आले आहे. विशेष म्हणजे हे सर्व सुविधांनी युक्त असे टॉयलेट आहे जे शो रूमपेक्षा कमी दिसत नाही.
2/6
मुलुंडमध्ये Railway ने महिलांसाठी उभारलं आलिशान टॉयलेट
3/6
मुलुंडमध्ये Railway ने महिलांसाठी उभारलं आलिशान टॉयलेट
मीडिया रिपोर्टनुसार, मध्य रेल्वेच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, "रेल्वेच्या नॉन-फेअर रेव्हेन्यू योजनेअंतर्गत मेसर्स लूम अँड वीव्हर रिटेल प्रायव्हेट लिमिटेडने वूलू महिला शौचालय विकसित केले आहे. सार्वजनिक स्वच्छतेसाठी हा एक अभिनव उपाय आहे. अत्याधुनिक सुविधांचे अनोखे मिश्रण या टॉयलेटमध्ये पाहायला मिळते.
4/6
मुलुंडमध्ये Railway ने महिलांसाठी उभारलं आलिशान टॉयलेट
Woloo महिला प्रसाधनगृहात उत्तम सुरक्षिततेसाठी वाय-फाय, सेंट्रलाइझ एसी, इंटिरिअर डेकोरेशन आणि सिक्युरिटीकरता एक्सेस कंट्रोल सॉफ्टवेअर आहे. विशेष बाब म्हणजे महिला प्रवाशांना या प्रिमियम टॉयलेट सुविधेचा लाभ 10 रुपये प्रति व्यक्ती शुल्काने मिळेल. याशिवाय, प्रवाशांची इच्छा असल्यास ते 365 रुपये वार्षिक वर्गणी देखील घेऊ शकतात.
5/6
मुलुंडमध्ये Railway ने महिलांसाठी उभारलं आलिशान टॉयलेट
6/6