Chandrayaan-3 Launch : 20 वर्षांपूर्वी... चांद्रयान मोहिमेविषयीची 'ही' माहिती तुम्हाला ठाऊकच नसेल

Chandrayaan-3 Launch : चांद्रयान 3 या दिवशी अकाशात झेपावत असून, या मोहीमेकडे फक्त भारतच नव्हे तर संपूर्ण जगाचं लक्ष लागून राहिलं आहे. कोट्यवधींचा खर्च, शास्त्रज्ञ, संशोधक आणि अभ्यासकांची मेहनत आणि देशवासियांच्या प्रार्थना सारंकाही या मोहिमेत पणाला लागलं आहे.   

Jul 14, 2023, 09:21 AM IST

Chandrayaan-3 Launch : भारतीय अंतराळ क्षेत्र आणि चांद्रयान मोहिमा यांचं एक अनोखं नातं आहे. देशाला जागतिक स्तरावर मान उंचावण्याची संधी देणाऱ्या याच मोहिमांमधील अत्यंत महत्त्वाचा टप्पा 14 जुलै रोजी सर केला जाणार आहे. 

1/8

चांद्रयान मोहिमा

Chandrayaan 3 Launch Countdown Live Updates take a look at previous moon missions by isro

Chandrayaan-3 Launch : चांद्रयान मोहिमा भारतासाठी इतक्या महत्त्वाच्या का आहेत? असा प्रश्न अनेकांनाच पडत आहे. या प्रश्नाचं उत्तर विविध निकषांवर आणि विविध कारणांवर आधारलेलं आहे. पण, त्याआधी चांद्रयान मोहिमेतील भारताचा इतिहास जाणून घेणंही तितकंच महत्त्वाचं. 

2/8

संकल्पना

Chandrayaan 3 Launch Countdown Live Updates take a look at previous moon missions by isro

2023 मध्ये चांद्रयान मोहिमेची संकल्पना अस्तित्वात आली आणि 15 ऑगस्ट 2003 मध्ये तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी यासंदर्भातील औपचारिक घोषणा केली. 

3/8

श्रीहरीकोटा

Chandrayaan 3 Launch Countdown Live Updates take a look at previous moon missions by isro

2008 मध्ये पीएसएलव्ही-सी 11 च्या मदतीनं श्रीहरीकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रावरून ‘चांद्रयान-1’चं प्रक्षेपण झावं आणि इस्रोच्या या मोहिमेनं आंतरराष्ट्रीय अंतराळ विश्वात एक नवा टप्पा गाठला. शास्त्रज्ञ मायिलसामी अन्नदुराई यांनी या मोहिमेचं नेतृत्त्वं केलं होतं. 

4/8

उपकरणं अंतराळात

Chandrayaan 3 Launch Countdown Live Updates take a look at previous moon missions by isro

पहिल्याच चांद्रयानातून भारतासह ब्रिटन, अमेरिका, स्वीडन, जर्मनी या देशांतील 11 वैज्ञानिक उपकरणं अंतराळात नेण्यात आली.   

5/8

लक्ष्यभेद

Chandrayaan 3 Launch Countdown Live Updates take a look at previous moon missions by isro

या मोहिमेच्या माध्यमातून अनेक लक्ष्यभेद करण्यात आले. ज्यानंतर वर्षभरातच या यानाची कक्षा 200 किमीनं वाढवण्यात आली होती.   

6/8

चांद्रयान 1

Chandrayaan 3 Launch Countdown Live Updates take a look at previous moon missions by isro

चांद्रयान 1 नं चंद्राभोवती 3400 हून जास्त प्रदक्षिणा घेतल्या आणि 29 ऑगस्ट 2009 मध्ये या यानाचा संपर्क तुटल्याची माहिती इस्रोनं देताच ही मोहिम संपुष्टात आली. 

7/8

चांद्रयान 2

Chandrayaan 3 Launch Countdown Live Updates take a look at previous moon missions by isro

तुलनेनं चांद्रयान 2 ची मोहिम अधिक आव्हानात्मक होती. कारण, चंद्राच्या दक्षिण ध्रुवाच्या शोधार्थ गेलेल्या लँडर (विक्रम), रोव्हर आणि ऑर्बिटरचा समावेश होता. 2019 मध्ये हे यान अवकाशात झेपावलं. त्याच वर्षी 20 ऑगस्टला ते चंद्राच्या कक्षेत समाविष्ट करण्यात आलं. 

8/8

निराशा आणि आशा...

Chandrayaan 3 Launch Countdown Live Updates take a look at previous moon missions by isro

चंद्राभोवती प्रदक्षिणा केल्यानंतर लँडर उतरण्याची अपेक्षा असतानाच 7 सप्टेंबर 2019 मध्ये चंद्राच्या पृष्ठापासून 2100 उंचीवर असताना त्याच्याशी संपर्क तुटला आणि मोहिमेला वेगळं वळण मिळालं. मोहिम अपयशी ठरली. संपूर्ण देशानं या मोहिमेकडून बऱ्याच अपेक्षा ठेवल्या होत्या. या क्षणांचे साक्षीदार होण्यासाठी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीही प्रत्यक्ष हजर राहिले होते. मोहिम मात्र अपयशी ठरली आणि सहभागी शास्त्रज्ञ कोलमडले. काहींच्या आसवांचा बांधही फुटला. अखेर पंतप्रधानांनीच या मंडळींना आधार देत त्यांना सावरलं होतं. (सर्व छायाचित्र- इस्त्रो)