केरळ विमान दुर्घटना: नागरी उड्डाण मंत्री हरदीपसिंग यांची घटनास्थळाला भेट

Aug 08, 2020, 13:48 PM IST
1/7

कोझिकोड विमानतळावर अपघात

कोझिकोड विमानतळावर अपघात

केरळमधील कोझिकोड विमानतळावर एअर इंडिया एक्सप्रेस विमानाला शुक्रवारी संध्याकाळी अपघात झाला. ज्यामध्ये दोन वैमानिकांसह 18 जण ठार झाले.  

2/7

विमान धावपट्टीवर घसरल्याने अपघात

विमान धावपट्टीवर घसरल्याने अपघात

शुक्रवारी केरळमध्ये मुसळधार पाऊस पडत होता. वंदे इंडिया मिशन अंतर्गत दुबईहून कोझिकोडला येणारे विमान धावपट्टीवर घसरल्याने हा अपघात झाला.  

3/7

एयर इन्वेस्टिगेशन ब्यूरो

एयर इन्वेस्टिगेशन ब्यूरो

दुबई येथून केरळला येत असलेल्या या विमान अपघाताची चौकशी एयर इन्वेस्टिगेशन ब्यूरो करणार आहे. 

4/7

18 जणांचा मृत्यू

18 जणांचा मृत्यू

कोझिकोड येथील विमान अपघातात वैमानिक आणि सह-वैमानिकांसह 18 जणांचा मृत्यू झाला. 

5/7

नागरी उड्डाण मंत्री घटनास्थळी

नागरी उड्डाण मंत्री घटनास्थळी

नागरी उड्डाण मंत्री हरदीपसिंग पुरी यांनी कोझिकोड विमानतळाला भेट दिली असून परिस्थितीचा आढावा घेतला.

6/7

दुबईहून आले होते विमान

दुबईहून आले होते विमान

वंदे भारत मिशन अंतर्गत एअर इंडिया एक्सप्रेस एएक्सबी 1344, बोईंग 737 विमान दुबईहून कोझिकोडकडे येत होते. या विमानात १८४ प्रवासी, २ विमान चालकांसह ६ क्रु मेंबर होते.

7/7

धावपट्टीवरुन घसरले विमान

धावपट्टीवरुन घसरले विमान

कोझिकोड विमानतळाच्या धावपट्टीवर उतरल्यानंतर एअर इंडिया एक्सप्रेसचे हे विमान धावपट्टीवर घसरले आणि भिंतीवर आदळले. ज्यामुळे विमान दोन भागात विभागले गेले.