रेड झोनमध्ये कोरोनाबाधित महिलेने दिला जुळ्या बाळांना जन्म

इंदोरचा रेड झोनमध्ये समावेश 

| May 24, 2020, 10:45 AM IST

मुंबई : देशात कोरोना व्हायरसमुळे सर्वाधिक संक्रमीत शहरांमध्ये इंदोरचा समावेश आहे. याच इंदोरमधून एक आनंदाची बातमी समोर आली आहे. याबातमीने नकारात्मक धुळ पुसून टाकली असून सगळीकडे आनंदाच वातावरण आहे. २८ वर्षीय कोरोनाबाधित महिलेने जुळ्या मुलांना जन्म दिला आहे. 

1/5

कोरोनाचा हॉटस्पॉट असलेल्या शहरात

कोरोनाचा हॉटस्पॉट असलेल्या शहरात

महाराजा तुकोजीराव होलकर चिकित्सालयाचे डॉ.सुमित शुक्ला यांनी दिलेल्या माहितीनुसार, कोविड-१९ ने संक्रमित असलेल्या महिलेला शनिवारी सकाळी प्रसुती कळा सुरू झाल्या. 

2/5

कोरोनाचा हॉटस्पॉट असलेल्या शहरात

कोरोनाचा हॉटस्पॉट असलेल्या शहरात

महिलेला तात्काळ रूग्णालयात दाखल करण्यात आलं. कोरोनाबाधित महिलेची प्रसुती हे डॉक्टरांसमोर आव्हान होतं. डॉक्टरांनी ते यशस्वीपणे पार पाडलं असून दोन जुळ्या मुलांना कोरोनाबाधित महिलेने जन्म दिला आहे. 

3/5

कोरोनाचा हॉटस्पॉट असलेल्या शहरात

कोरोनाचा हॉटस्पॉट असलेल्या शहरात

डॉ. शुक्ला यांनी दिलेल्या माहितीनुसार, कोरोनाबाधित महिलेला प्रसुतीच्या एक महिना अगोदरच कळा सुरू झाल्या. तिच्या जुळ्या मुलांच वजन हे १.६-१.६ किलो असं होतं. जे सामान्य मुलांच्या तुलनेत नक्कीच कमी आहे. 

4/5

कोरोनाचा हॉटस्पॉट असलेल्या शहरात

कोरोनाचा हॉटस्पॉट असलेल्या शहरात

डॉक्टरांची एक विशेष टीम या महिलेच्या देखरेखीकरता तयार करण्यात आली. गर्भात नऊ महिन्यांचा कालावधी झाल्यावर बाळांच वजन हे सामान्यपणे २.५ किलो आणि ३.५ किलो असं असतं.   

5/5

कोरोनाचा हॉटस्पॉट असलेल्या शहरात

कोरोनाचा हॉटस्पॉट असलेल्या शहरात

कोरोनाचं संक्रमण सर्वाधिक असल्यामुळे इंदोर जिल्हा रेड झोनमध्ये आहे. आतापर्यंत महामारीमुळे २९३३ लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. यामध्ये १११ कोरोनाग्रस्तांचा मृत्यू झाला आहे.