Corona Vaccine घेणारी पहिली बॉलिवूड अभिनेत्री

Jan 08, 2021, 13:43 PM IST
1/5

शिल्पा शिरोडकरने घेतली कोविडची लस

शिल्पा शिरोडकरने घेतली कोविडची लस

बॉलीवुड अभिनेत्री शिल्पा शिरोडकर (Shipla Shirodkar) ने कोरोनाची लस घेतली आहे. सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत दिली माहिती. 

2/5

अभिनेत्रीने दिली माहिती

अभिनेत्रीने दिली माहिती

सोशल मीडियावर स्वतः अभिनेत्री शिल्पा शिरोडकरने याची माहिती दिली आहे. शिल्पा लिहिते की,'कोरोना व्हॅक्सीन घेतलं आहे आणि मी आता सुरक्षित आहे. Thank you UAE.`

3/5

यूएईमध्ये आहे शिल्पा शिरोडकर

यूएईमध्ये आहे शिल्पा शिरोडकर

अनेक देशांमध्ये कोरोना लसीच्या वाटपाला सुरूवात झाली आहे. शिल्पा शिरोडकर (Shipla Shirodkar) यूएईमध्ये राहते. त्यांनी नुकतीच कोरोनाची लस घेतली आहे. 

4/5

शिल्पा आहे नम्रता शिरोडकरची बहिण

शिल्पा आहे नम्रता शिरोडकरची बहिण

शिल्पा (Shipla Shirodkar) पूर्व मिस इंडिया नम्रता शिरोडकर (Namrata Shirodkar) ची बहिण आहे. साऊथ स्टार महेश बाबूची मेहुणी आहे. शिल्पा आणि नम्रता दोघांनी एकाचवेळी करिअरला सुरूवात केलेली. नम्रताने अगोदर मॉडेलिंग आणि नंतर सिनेमात काम केलं. शिल्पाने सिनेमांपासूनच कामाला सुरूवात केली. 

5/5

शिल्पाने केला होता हा सिनेमा

शिल्पाने केला होता हा सिनेमा

शिल्पा शिरोडकर (Shipla Shirodkar) ने `किशन कन्हैया`, `त्रिनेत्र`, `हम`, `दिल ही तो है`, `आंखें`, `पहचान`, `गोपी किशन`, `मृत्युदंड` सारख्या हिट सिनेमांत काम केलं आहे. 'गज गामिनी' या सिनेमात शेवटचं काम केलं. लग्नानंतर तिने काम सोडलं. लग्नाच्या १० वर्षांनंतर तिने टीव्ही शोमध्ये काम केलं. `एक मुट्ठी आसमान` मालिकेत ती दिसली.