close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

कर्करोग आणि वाढत्या वजनावर नियंत्रण मिळवण्यासाठी डाळी उपयुक्त

आजच्या धकाधकीच्या जीवनात आरोग्याकडे लक्ष देणे फार कठीण झाले आहे. कामाच्या वाढत्या व्यापामुळे नियमित आहाराकडे दूर्लक्ष होते.

May 19, 2019, 21:54 PM IST

मुंबई : आजच्या धकाधकीच्या जीवनात आरोग्याकडे लक्ष देणे फार कठीण झाले आहे. कामाच्या वाढत्या व्यापामुळे नियमित आहाराकडे दूर्लक्ष होते. त्याचप्रमाणे बाहेरचे फास्ट फूड आणि तळलेले पदार्थ सुद्धा वजन वाढ आणि कर्करोग या गंभीर आजारांना आमंत्रित करतात. पण रोजच्या नियमित आहारात जर डाळींचा समावेश केला, तर आपल्या आरोग्यास ते फार गुणकारी ठरेल. रोज सकाळी फक्त ५० ग्रॉम डाळींचे सेवन केले, तर ते शरीरास फार उपयुक्त ठरेल. 

1/6

डाळींमध्ये आयरन, फाइबर, कॅल्शियम, प्रोटीन आणि विटॉमिन जास्त प्रमाणात असतात. सर्व प्रकारच्या डाळी एक असा आहार आहे, ज्यामध्ये सर्व प्रकारच्या पोषक तत्वांचा समावेश होतो.  

2/6

डाळींमध्ये भरपूर प्रमाणात फायबर असते. त्यामुळे शरीरात कोलेस्ट्रॉलचे प्रमाण नियंत्रित राहण्यास मदत होते. डाळींचे नियमित सेवन केल्याने हृदय रोगाच्या आजारांवर मात करता येते. 

3/6

धकाधकीचे जीवन आणि आधुनिक जीवनशैली हे तरूणांमधील वजन वाढण्याचे प्रमुख कारण आहे. सकाळच्या आहारात डाळींचे सेवन केल्याने वजन नियंत्रित राहण्यास मदत होते. त्याचप्रमाणे पोट भरलेले राहते.  

4/6

आताच्या काळात हाडांमध्ये अशक्तपणा एक सामान्य समस्या आहे. डाळींमध्ये मॅग्नेशियम, कॅल्शियमचे प्रमाण फार असते. त्यामुळे हाडांना मजबुती प्राप्त होण्यास मदत होते.

5/6

डाळींच्या नियमित सेवनाने मधुमेहाचे प्रमाण सुद्धा कमी होते. नियमित स्वरूपात डाळींचे सेवन केल्याने मधुमेह प्रकार दोन होण्याची शक्यता मोठ्या प्रमाणावर कमी होते.

6/6

महिलांमध्ये स्तनाच्या कर्करोगाचे प्रमाण जास्त असते. डाळींच्या नियमित सेवनाने स्तनाच्या कर्करोगासारख्या आजारावर मात करणे शक्य होते. डाळींमध्ये फायबर योग्य प्रमाणात असल्याने ब्रेस्ट कर्करोगाची शक्यता कमी होते.