'मिस्ट्री गर्ल'सोबत दीपक चाहरचं असंही नातं...

Nov 13, 2019, 15:44 PM IST
1/7

भारतीय संघाचा फास्ट बॉलर दीपक चाहरने बांगलादेशविरुद्ध नागपूरमध्ये झालेल्या टी-२० सामन्यात हॅट्रिक करत वर्ल्ड रेकॉर्ड आपल्या नावे केला. दीपक चाहर टी-२० इंटरनॅशनलमध्ये हॅट्रिक करणारा पहिला भारतीय बॉलर ठरला आहे. दीपक चाहरच्या या धमाकेदार कामगिरीसाठी त्याची बहिण मालती चाहरही आनंद व्यक्त केला आहे.(फोटो सौजन्य : मालती चाहर इन्स्टाग्राम)

2/7

दीपक चहरची बहिण मालती चाहरने इंन्स्टाग्रामवरुन एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये मालतीने मला तुझा अभिमान असल्याचं लिहिलंय. (फोटो सौजन्य : मालती चाहर इन्स्टाग्राम)

3/7

मालती चाहर मॉडेल आहे. इन्स्टाग्रामवर तिचे अनेक फॉलोवर्स असून ती सोशल मीडियावर नेहमी अॅक्टिव्ह असते. (फोटो सौजन्य : मालती चाहर इन्स्टाग्राम)

4/7

मालती इन्स्टाग्रामवर तिच्या भावंडांसोबतचे दीपक चाहर आणि राहुल चाहरसोबतचे फोटो शेअर करत असते. (फोटो सौजन्य : मालती चाहर इन्स्टाग्राम)

5/7

मालतीने मिस दिल्ली स्पर्धेत तिसऱ्या क्रमांक पटकावला होता. आता ती कलाविश्वात आपलं करियर बनवण्याच्या प्रयत्नात असल्याचं बोललं जात आहे. (फोटो सौजन्य : मालती चाहर इन्स्टाग्राम)

6/7

इंडियन प्रीमियर लीग २०१८ (आयपीएल) मध्ये चेन्नई सुपरकिंग्ज सामन्यादरम्यान ती 'मिस्ट्री गर्ल' नावाने व्हायरल झाली होती. (फोटो सौजन्य : मालती चाहर इन्स्टाग्राम)

7/7

त्यानंतर मात्र ती 'मिस्ट्री गर्ल' नसून दीपक चाहरची बहीण असल्याचं समोर आलं. (फोटो सौजन्य : मालती चाहर इन्स्टाग्राम)