close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

'तेजस'मधून भरारी घेणारे देशाचे पहिले संरक्षण मंत्री

Sep 19, 2019, 12:33 PM IST
1/4

संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी (Rajnath Singh) गुरुवारी  'तेजस'मधून भरारी घेतली. लढाऊ विमानातून उड्डाण करणारे राजनाथ सिंह देशाचे पहिले संरक्षण मंत्री ठरले आहेत.  

2/4

राजनाथ सिंह यांनी बंगळुरुच्या एचएल विमानतळावरुन हे उड्डाण केले. माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी आपल्या देशात तयार करण्यात आलेल्या या विमानाला 'तेजस' हे नाव दिले होते. 'तेजस' जगातील सर्वात छोटे आणि हलके फायटर जेट आहे.

3/4

'तेजस' या फायटर जेटचा वेग ताशी 2 हजार किमीहून अधिक आहे. हे 5 हजार फूटहून अधिक उंचीवर जाऊ शकते.

4/4

'तेजस'मधील उड्डाणाबाबत आपला अनुभव शेअर करताना राजनाथ सिंह म्हणाले, 'तेजसमध्ये बसून हे विमान कसे असते याचा अनुभव घेण्याची माझी इच्छा होती...माझ्या आयुष्यातील हा विशेष अनुभव होता... मी हवेशी बोलत होतो...मला अतिशय आनंद होत होता...मी वैमानिकांच्या शौर्याचे आणि पराक्रमाचे कौतुक करतो. तेजस पूर्णपणे स्वदेशी बनावटीचे लढाऊ विमान आहे. एचएएल (HAL), शास्त्रज्ञ, डीआरडीओवर (DRDO) गर्व असल्याचे राजनाथ सिंह म्हणाले.