मेट्रो पाहण्यासाठी अजितदादांची पुन्हा एकदा पहाटेची सैर

Sep 25, 2020, 11:27 AM IST
1/7

उपमुखयमंत्री, पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी शुक्रवारी पुण्यातील मेट्रोच्या कामाची पाहणी केली. 

2/7

अजित पवार सकाळी सहा वाजताच मेट्रोच्या साईटवर आले होते. 

3/7

मेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक ब्रिजेश दीक्षित यांनी यावेळी अजित पवार यांना प्रकल्पाच्या कामाची माहिती दिली.

4/7

अजित पवारांनी शिवाजीनगर येथे मॉडेल ट्रेनने प्रवास करत मेट्रोच्या कामाचा आढावा घेतला.

5/7

सध्या कोविड परिस्थितीचा परिणाम मेट्रोच्या कामावर झालाय. मनुष्यबळाची कमतरता आहे, अशा परिस्थितीत मेट्रोचे काम ठरलेल्या वेळेत कसं पूर्ण होईल याकडे अजित पवारांकडून लक्ष देण्यात येत आहे.

6/7

 गेल्या आठवड्यातही त्यांनी पिंपरी चिंचवडमध्ये सुरु असलेल्या कामाची पाहणी केली होती. 

7/7

 पिंपरी चिंचवड ते स्वारगेट आणि वनाज ते रामवडी या दोन मार्गांचे काम महामेट्रो कडून सुरु आहे. (सर्व फोटो :  @AjitPawarSpeaks)