DID फेम शक्ती मोहनच्या घायाळ करणाऱ्या अदा

सध्या ती यशाच्या शिखरावर विराजमान आहे.    

Jan 12, 2020, 15:18 PM IST

मुंबई : नृत्यांगना आणि नृत्य दिग्दर्शक शक्ती मोहनचे काही फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. आपल्या नृत्य अदांनी चाहत्यांना घायाळ करणारी शक्ती कायम सोशल मीडियावर सक्रिय असते. आईएएनएसला दिलेल्या एका मुलाखतीत तिने स्वत:चे एक मोठं स्वप्न पूर्ण झाल्याचं सांगितलं आहे. ती लवकरच अभिनेता रणबीर कपूर काम करताना दिसणार आहे. 'शमशेरा' चित्रपटात तिने एका गाण्याचं नृत्य दिग्दर्शन केलं आहे. 'शमशेरा' चित्रपट यंदाच्या वर्षी प्रदर्शित होणार आहे. 

1/5

'डान्स इंडिया डान्स'च्या माध्यमातून प्रकाशझोतात

'डान्स इंडिया डान्स'च्या माध्यमातून प्रकाशझोतात

'डान्स इंडिया डान्स' या रियालिटी शोच्या माध्यमातून तिने आपल्या करियरची सुरूवात केली. 'डान्स इंडिया डान्स २' मधून तिला प्रसिद्धी मिळाली. 

2/5

अनेक चित्रपटांमध्ये झळकली आहे शक्ती.

अनेक चित्रपटांमध्ये झळकली आहे शक्ती.

DID मध्ये यश मिळवल्यानंतर तिने आपला मोर्चा चित्रपटांकडे आपला मोर्चा वळवला. तिने आतापर्यंत 'तीस मार खान', 'कांचा' आणि 'रावडी राठोर' या चित्रपटांमध्ये आपला जलवा दाखवला आहे. 

3/5

आता झळकते परिक्षकाच्या भूमिकेत

आता झळकते परिक्षकाच्या भूमिकेत

नृत्य क्षेत्रात आता शक्तीचा हात कोणीच पकडू शकत नाही. तिने अनेक डान्सिंग शोमध्ये परिक्षकाची धुरा सांभाळली आहे. 'डान्स प्लस', 'डान्स प्लस २' या शोमध्ये तिने परिक्षकाची भूमिका बजावली आहे. 

4/5

आयएएस होण्याची शक्तीची इच्छा

आयएएस होण्याची शक्तीची इच्छा

शक्तीची आयएस होण्याची इच्छा होती परंतु नशिबाच्या पुढे कोणाचं चालतं नाही असचं काही शक्ती सोबत झालं. 'डान्स इंडिया डान्स २' मध्ये शक्तीची निवड झाली आणि तिचा नृत्याचा प्रवास सुरू झाला. 

5/5

दिल्लीत घेतलं शिक्षण

दिल्लीत घेतलं शिक्षण

शक्तीने तिचं विद्यालयीन शिक्षण बिर्ला बालीक विद्यापिठातून घेतले आहे. त्यानंतर तिने तिचं महाविद्यालयीन शिक्षण मुंबईच्या सेंट झेवियर्स महाविद्यालयातून पूर्ण केलं आहे. पॉलिटिकल सायन्स या विषयात तिने पदवी संपादक केली. सध्या ती यशाच्या शिखरावर विराजमान आहे.