close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

चाहत्याची 'दिवानगी'; अंगावर अभिनेत्रीच्या नावाचा टॅटू गोंधला

टेलिव्हिजनवरील लोकप्रिय अभिनेत्री दिव्यांका त्रिपाठी सोशल मीडियावर नेहमी अॅक्टिव्ह असते. इन्स्टाग्रामवर तिचे १० मिलियनहून अधिक चाहते आहेत. दिव्यांकाने तिच्या सोशल मीडियावर अकाउंटवर एका चाहतीचे फोटो शेअर केले आहेत. त्या चाहतीने तिच्या अंगावर दिव्यांकाचा टॅटू काढला आहे.

Aug 13, 2019, 18:29 PM IST
1/5

दिव्यांका त्रिपाठीने तिच्या इन्स्टाग्रामवर चाहतीसोबत फोटो शेअर केला आहे. चाहतीच्या या प्रेमाने दिव्यांका भावूक झाली आहे.

2/5

चाहतीने हातावर दिव्यांकाचं नाव लिहिलं आहे. तर पाठीवर दिव्यांकाच्या चेहऱ्याचा टॅटू काढला आहे.

3/5

दिव्यांकाने झी टीव्हीवरील 'बनू मै तेरी दुल्हन' या मालिकेतून करियरची सुरुवात केली होती. दिव्यांका आणि तिचा पती विवेक यांची जोडी सोशल मीडियावर 'दिवेक' या नावाने ओळखली जाते. दिव्यांका आणि विवेक यांनी रिअॅलिटी डान्स शो 'नच बलिये'चा किताबही जिंकला होता.

4/5

विवेकसोबत लग्न करण्याआधी दिव्यांका शरद मल्होत्राला डेट करत होती. 'बनू मै तेरी दुल्हन' या मालिकेत त्यांची पहिल्यांदा ओळख झाली होती. त्यानंतर ८ वर्षे दोघे एकमेकांना डेट करत होते. पण २०१५ मध्ये दोघांचे मार्ग वेगळे झाले. 

5/5

दिव्यांका राजीव खंडेलवालसह 'कोल्ड लस्सी और चिकन मसाला' या वेब सीरीजमध्ये पहिल्यांदाच काम करत आहे.