Raju Shrivastava च नाही, तर 'या' सेलिब्रिटींच्याही मृत्यूचं कारण ठरलं Heart Attack

मुंबई :  सुप्रसिद्ध कॉमेडियन राजू श्रीवास्तवच्या निधनाने सर्वांनाचं दु:ख झालं आहे. राजू श्रीवास्ताव यांनी त्यांच्या विनोदाने सर्वांना हसवण्याचं काम केलं होतं. पण, Heart Attack नं त्यांचा घात केला आणि एका कलाकारासोबत एका चांगल्या व्यक्तीलाही आपण मुकलो. हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू होणाऱ्यांपैकी केवळ राजू श्रीवास्तवच नाही, तर इतरही सेलिब्रिटींचा समावेश आहे. कोण होते ते सेलिब्रिटी ज्यांना नियतीनं आपल्यापासून हिरावलं.... ते पाहुया

Sep 21, 2022, 12:47 PM IST
1/6

केके

आपल्या आवाजाने सर्वांची मनं जिंकणारा गायक केके याचा मृत्यू देखील हृदयविकाराच्या झटक्यामुळे झाला होता.

2/6

सिद्धार्थ शुक्ला

'बिग बॉस 13' चा विजेता ठरलेल्या सिद्धार्थ शुक्लाचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्यामुळे झाला होता.

3/6

अमित मिस्त्री

बॉलिवूड अभिनेता अमित मिस्त्री यांचा मृत्यूला देखील हृदयविकार हेच कारण जबाबदार होतं. वयाच्या अवघ्या 47 व्या वर्षी या अभिनेत्याचा मृत्यू झाला होता. 

4/6

आरती अग्रवाल

तेलुगू चित्रपटांमधून आपल्या कामाची छाप पाडणाऱ्या आरती अग्रवाल यांचा मृत्यू देखील हृदयविकाराच्या झटक्याने झाला होता.

5/6

अबीर गोस्वामी

अखेरचा श्वास घेतला त्यावेळी त्यांचं वय 31 वर्षे इतकं होतं.

6/6

राज कौशल

मंदिरी बेदीचा पती आणि बॉलिवूड चित्रपट निर्माते राज कौशल यांचं निधनही हृदयविकाराच्या झटक्याने झालं होतं.