अमेरिकेतील साजरा केला जातो अनोखा 'मार्डी ग्रास' उत्सव, या दिवशी लोक काय करतात? जाणून घ्या मनोरंजक माहिती

What is Mardi Gras?: अमेरिकेतील लोक मोठ्या थाटामाटात साजरा करतात तो मार्डी ग्रास म्हणजे काय? हा सण कोण साजरा करतो आणि तो साजरा करण्याचे कारण काय आहे? या दिवशी लोक काय करतात?  

तेजश्री गायकवाड | Apr 15, 2025, 12:31 PM IST

What is Mardi Gras?: अमेरिकेतील लोक मोठ्या थाटामाटात साजरा करतात तो मार्डी ग्रास म्हणजे काय? हा सण कोण साजरा करतो आणि तो साजरा करण्याचे कारण काय आहे? या दिवशी लोक काय करतात?

 

1/7

अमेरिकेत 'मार्डी ग्रास' म्हणून ओळखला जाणारा एक अतिशय प्रसिद्ध उत्सव आहे. या उत्सवात मोठ्या संख्येने लोक सहभागी होतात. हा अमेरिकेतील न्यू ऑर्लीन्सचा सर्वात मोठा आणि प्रसिद्ध फेस्टिवल आहे.  

2/7

मार्डी ग्रास हा ख्रिश्चन लेंट सुरू होण्यापूर्वीचा एक खास दिवस आहे, ज्याला लोक 'फॅट ट्युजडे' असेही म्हणतात. या काळात लोक रंगीबेरंगी कपडे घालून रस्त्यावर येतात. मार्डी ग्रास हा सण विशेषतः कॅथोलिक ख्रिश्चन लोक मोठ्या थाटामाटात साजरा करतात. 

3/7

आता असा प्रश्न पडतो की लेंट म्हणजे काय?  खरं तर, लेंट हा ख्रिश्चन धर्मातील एक महत्त्वाचा धार्मिक सण आहे जो इस्टरच्या ४० दिवस आधी चालतो.  

4/7

ज्याप्रमाणे मुस्लिम धर्माचे लोक उपवास ठेवतात, त्याचप्रमाणे ख्रिश्चन धर्मात उपवास ठेवतात. या काळात लोक उपवास करतात आणि प्रार्थना करतात. यामागचे कारण असे की, येशू ख्रिस्त 40 दिवस काहीही न खाता किंवा न पिता वाळवंटात होते आणि त्या काळात त्यांना छळण्यात आले. लोक त्याच्या स्मृतीप्रित्यर्थ 'उपवास' साजरा ठेवतात. ख्रिश्चन धर्माचे लोक हे 40 दिवस स्वतःला शुद्ध करण्याची आणि देवाच्या जवळ जाण्याची संधी म्हणूनहि याकडे बघतात. 

5/7

मार्डी ग्रास हा ख्रिश्चन धर्मातील 40 दिवसांच्या उपवासाच्या आधीचा शेवटचा दिवस आहे, ज्यामध्ये लोक भरपूर खातात आणि पितात, भरपूर नाचतात आणि गातात. मार्डी ग्रास नंतरच्या दिवसापासून लेंटचे उपवास सुरू होतात.

6/7

लेंट दरम्यान 40 दिवसांच्या उपवासाच्या आधी, लोक खूप मजा करतात आणि या काळात ते एकमेकांना भेटतात, त्यांच्या तक्रारी सोडवतात आणि संगीताचा भरपूर आनंद घेतात.मार्डी ग्रास हा सण ख्रिश्चन लोक जीवनाचा आनंद, स्वातंत्र्य आणि सामुदायिक एकतेचे प्रतीक म्हणून साजरा करतात.

7/7

मार्डी ग्रास दरम्यान, एक भव्य परेड आयोजित केली जाते ज्यामध्ये लोक रंगीबेरंगी कपडे आणि मुखवटे घालून बाहेर पडतात. यासोबतच, लोक संगीताच्या तालावर खूप नाचतात. या दिवशी विशेष जेवणाचेही आयोजन केले जाते.