close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

फोटोतील अभिनेत्रीला ओळखलात का?

 बॉलिवूड अभिनेत्री नेहमीच सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांसह त्यांच्या दैनंदिन आयुष्यातील घडामोडी शेअर करत असतात. 

Jun 10, 2019, 14:02 PM IST

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री नेहमीच सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांसह त्यांच्या दैनंदिन आयुष्यातील घडामोडी शेअर करत असतात. बॉलिवूड अभिनेत्री यामी गौतमने आईच्या वाढदिवसाचे औचित्य साधत सोशल मीडियावर तिच्या लहानपणीचा फोटो पोस्ट केला आहे. सध्या हा फोटो चांगलाच व्हायरल होत आहे. यामीने 'विकी डोनर' या चित्रपटाच्या माध्यमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. त्यानंतर तिच्या लोकप्रियतेत झपाट्याने वाढ झाली. त्याचप्रमाणे अभिनेता ह्रतिक रोशन आणि अभिनेत्री यामी गौतम स्टारर चित्रपट चीनमध्ये प्रदर्शित करण्यात आला. यावेळेस आंतरराष्ट्रीय आयकॉन असलेल्या जॅकी चॅनने यामीला भेट स्वरूपात एक पारंपरीक शॉल दिली. 

1/5

जॅकी चॅगकडून पारंपरीक शॉल भेट

जॅकी चॅगकडून पारंपरीक शॉल भेट

यामी म्हणाली की, 'मी भारत देशात 'बाला' चित्रपटाच्या चित्रिकरणात व्यस्त होती. त्यामुळे मला त्यांना भेटता आले नाही. जेव्हा त्यांनी मला भेट म्हणून पारंपरीक शॉल दिली, तेव्हा मला फार आश्चर्य वाटले. बीजिंगमध्ये असताना मला ही भेट मिळाली.'   

2/5

आईला वाढदिवसाच्या शुभेच्छा

आईला वाढदिवसाच्या शुभेच्छा

यामीने तिच्या आईला सोशल मीडियाच्या माध्यमातून वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. फोटो शेअर करत तिने 'आई तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा, तुझी छोटी यामू' असे भावूक कॅप्शन दिले आहे. 

3/5

यामीचा ग्लॅमरस अंदाज

 यामीचा ग्लॅमरस अंदाज

विविध चित्रपटात आपल्या अभिनय कौशल्याच्या जोरावर तिने चाहत्यांच्या मनात घर केले आहे. तिचे सौंदर्य आणि दिलखेच अदा चाहत्यांना आकर्षित करतात. 

4/5

चीनमध्ये 'काबिल' चित्रपटाला प्रसिद्धी

चीनमध्ये 'काबिल' चित्रपटाला प्रसिद्धी

चिनच्या समिक्षकांनी 'काबिल' चित्रपटाला चांगल्या प्रतिक्रिया दिल्या, त्याचप्रमाणे चीनी चाहत्यांनी तर या चित्रपटाला चांगलेच डोक्यावर घेतले. 

5/5

'काबिल'मधील मुख्य भूमिका

'काबिल'मधील मुख्य भूमिका

'काबिल' चित्रपटात यामी आणि ह्रतिकने एकत्र स्क्रिन शेअर केली होती. (छाया सौजन्य-यामी गौतम इन्स्टाग्राम अकाउंट)