Black Mamba सापाशी पंगा नकोच, एकच दंश पडतो महागात

जगात सापांच्या विविध प्रजाती आहेत. अनेक साप विषारी असतात तर काही नसतात. सापांच्या आफ्रिकन मांबा प्रजातीबद्दल बोलायचे तर ते खूप धोकादायक आहेत. काळ्या मांबा (डेंड्रोस्पिस पॉलीलेपिस) सापाची प्रजाती त्याच्या मोठ्या आकाराच्या, वेगवान आणि अत्यंत घातक विषासाठी ओळखली जाते. आफ्रिकेतील हा साप सर्वात धोकादायक सापांपैकी एक आहे.

Nov 06, 2022, 20:53 PM IST

Deadliest Snake: जगात सापांच्या विविध प्रजाती आहेत. अनेक साप विषारी असतात तर काही नसतात. सापांच्या आफ्रिकन मांबा प्रजातीबद्दल बोलायचे तर ते खूप धोकादायक आहेत. काळ्या मांबा (डेंड्रोस्पिस पॉलीलेपिस) सापाची प्रजाती त्याच्या मोठ्या आकाराच्या, वेगवान आणि अत्यंत घातक विषासाठी ओळखली जाते. आफ्रिकेतील हा साप सर्वात धोकादायक सापांपैकी एक आहे.

1/5

black mamba

ब्लॅक मांबाची सरासरी लांबी 2-2.5 मीटर (6.6-8.2 फूट) असते. तर कमाल लांबी 4.3 मीटर (14 फूट) नोंदवली गेली आहे. या सापाचं नाव ब्लॅक मांबा असला तरी तो दिसायला गडद तपकिरी दिसतो. त्याच्या जबड्याचा रंग मात्र काळा असतो. ग्रीन मांबा आणि इतर सापांचा जबडा पांढरा असतो. 

2/5

black mamba

ब्लॅक मांबा खडकाळ आणि सखल जंगलात आढळतो. ब्लॅक मांबा प्रामुख्याने जमिनीवर राहणे पसंत करतात. सर्वात वेगवान सापांपैकी एक असून ताशी 12 मैल (19 किमी) पेक्षा जास्त वेगाने सरपटू शकतो. ब्लॅक मांबा साधारणपणे 6 ते 20 अंडी घालते.

3/5

black mamba

ब्लॅक मांबा सहसा लाजाळू आणि चिंताग्रस्त असतो. भीतीपोटी तो अतिशय वेगाने पळ काढतो. तसेच आपल्या शिकारीवर वेगाने हल्ला करतो. एकदा हल्ला केला की तो आपल्या शिकारीला वारंवार दंश करतो.

4/5

black mamba

ब्लॅक मांबा इतका विषारी आहे की त्याच्या विषाचे फक्त दोन थेंबाने माणसाचा मृत्यू होऊ शकतो. त्याचे विष मानवी मज्जासंस्था आणि हृदय दोन्ही निष्प्रभावी करते.

5/5

black mamba

असं असलं तरी दरवर्षी केवळ काही मृत्यूंसाठी ब्लॅक मांबा जबाबदार आहे. विनाकारण मानवांवर हल्ला करत नाही. जंगलातील काळे मांबा सामान्यत: किमान 11 वर्षे जगतात, तर बंदिवासात असलेले 20 वर्षांपेक्षा जास्त जगतात.