परिणीती-राघवचा शाही विवाहसोहळा, पॅलेसच्या एका रात्रीचं भाडं ऐकून धक्का बसेल

Parineeti-Raghav Wedding : बॉलिवूड अभिनेत्री परिणीती चोप्रा आणि आप नेते राघव चड्ढा यांच्या विवाहाला आता काही तासांचा अवधी उरला आहे. राजस्थानमधल्या अलिशान पॅलेसमध्ये हा विवाहसोहळा पार पडणार आहे. विविध क्षेत्रातील प्रतिष्ठित व्यक्तींना या सोहळ्याचं आमंत्रण देण्यात आलं आहे. 

| Sep 22, 2023, 17:36 PM IST
1/10

परिणीती आणि राघव चड्ढाचं लग्न राजस्थानमधल्या शाही पॅलेसमध्ये रंगणार आहे. त्यांनी आपल्या लग्नासाठी उदयपूरमधल्या लीला पॅलेस या अलिशान हॉटेलची निवड केली आहे. लीला पॅलेस हे निसर्गाच्या सानिध्यात वसलेलं आहे. हॉटेलच्या एका बाजूला पिछोला तलाव आहे. तर चोहो बाजूंनी हॉटेल अरावली डोंगरांनी वेढलेला आहे. 

2/10

या हॉटेलचे रॉयल सुइट्स सर्वात महागडे आहेत. हे सुइट्स इतके मोठे आहेत की यात एक बंगला बांधला जाऊ शकतो. रॉयल सुइट्समध्ये एक मोठं घुमट आहे. शिवाय आरशांनी बनलेलं टिकरी आर्ट आहे. यातून मेवाडच्या संस्कृतीचं दर्शन घडतं. हे आर्टवर्क पॅलेसच्या भिंतीवर आणि बालकनीवर पाहिला मिळतं. 

3/10

राघव आणि परिणीतीचं लग्न 24 सप्टेंबरला होणार आहे. त्याआधी पिछोला तलावाच्यामधोमध असलेल्या हॉटेल ताजमध्ये दोघांचा साखरपुडा पार पडेल. यानंतर राघव आणि परिणीत बोटिने लीला पॅलेसमध्ये पोहतील. बोटिलाही मेवाड संस्कृतीची सजावट केली जाणार आहे.

4/10

लीला पॅलेस आणि पिछोला तलावामधली अंतर कमी आहे. लीला पॅलेसमधून पिछोला तलाव, हॉटेल ताज आणि सिटी पॅलेस अगदी सहज दिसतं. नवरा-नवरी व्यतिरिक्त पाहुण्यांसाठी  बूक करण्यात आलेले सुइट्सही महागडे आणि आकर्षक आहेत. यात मेवाड, मेवाड टेरिस आणि मारवाड असे तीन विभाग आहेत. 

5/10

या हॉटेलमध्ये आठ प्रकारचे रुम आहेत. याचं एका रात्रीचं भाडं 47 हजार ते 10 लाख रुपये इतकं आहे. यापैकी महाराजा, रॉयल, ड्युप्लेक्स आणि लग्झरी सुइट्स सर्वात महागडे आहेत. तर ग्रँड हॅरिटेज लेक व्ह्यू आणि ग्रँड हॅरिटेज गार्डन व्ह्यूच्या रुमची किंमत त्यामानाने कमी आहे. 

6/10

महाराजा सुइट जवळपास 3 हजार 585 स्क्वेअर फूटमध्ये पसरला आहे. याची एका रात्रीची किंमत 10 लाक रुपये इतकी आहे. या सुइट्समध्ये लिविंग रुम, स्टडी रुम, मास्टर बेडरुम, डाइनिंग एरिया आणि वॉर्डरोब आहेत. याशिवाय बाथरुममध्ये किंग साईज बाथटब आणि मसाज पार्लर आहे. आकर्षक म्हणजे याला लागूचन लेकसाईक व्हू असणारा स्विमिंग पूल आहे. 

7/10

रॉयल सुइट्स क्षेत्रफण 1800 स्क्वेअर फूट इतकं आहे. या रुममधून पिछोला झील आणि अरावली डोंगराचं आकर्षक रुप पाहिला मिळतं. या रुमच्या भिंतीवर मेवाडच्या संस्कृतीचं दर्शन घडवारी टिकरी आर्ट आहे. या रुममधले मोठाले घुमट आहेत. या  रुममध्ये मास्टर बेडरुम, मार्बल बाथरुम आणि जाकूजी आहे. या रुमचं एका रात्रीचं भाडं जवळपास 4 लाख रुपये इतकं आहे. 

8/10

ड्युप्लेस् सुईट्स 1270 स्क्वेअर फूटमध्ये पसरलं आहे. यात लिविंग रुम असून त्याला जोडूनच स्विमिंग पूल आहे. या रुममधून सिटी पॅलेस आणि इतर ऐतिहासिक इमारतींचं दर्शन घडतं. या एक मास्टर बेडरुम आणि वॉक इ शॉवर आहे. या रुमचं एका रात्रीचं भाडं किमान 1.5 लाख रुपये इतकं आहे. 

9/10

लक्झर सुट्सचं क्षेत्रफळ 960 ते 1250 स्क्वेअर फुट इतकं आहे. यात लिविंग रुम आणि स्टायलिश बेडरुम आहे. यात शॉवर स्टॉल आणि बाथटब आहे. या रुमचं एका रात्रीचं भाडं किमा 85 हजार रुपये इतकं आहे. याशिवाच इतर दोन सुट्सचं भाडं 47 हजार आणि 43 हजार इतकं आहे. 

10/10

लग्नानंतर परिणीती आणि राघव चंदीगडमध्ये रिसेप्शन पार्टी देणार आहेत. यानंतर दिल्लीत एक रिसेप्शन पार्टी आयोजित करण्यात आली आहे. या सोहळ्यासाठी व्हीव्हीआयपी पाहुणे उपस्थित राहाणार आहेत.