तुमची भूक भागवणार 'बाहुबली डोसा'

Sep 11, 2019, 10:04 AM IST
1/5

दाक्षिणात्य खाद्यपदार्थांना खवय्यांची कायम प्रसिद्धी मिळत असते. चव, पोषक तत्त्व आणि इतरही अनेकघटकामुळे या पदार्थांना पसंती मिळते. सध्या याच यादीत एका चित्रपटाशी निगडीत पदार्थ अनेकांचं लक्ष वेधत आहे. हा पदार्थ म्हणजे, 'बाहुबली डोसा'. जवळपास चार फूट इतकी लांबी असणारा हा डोसा खाण्यापेक्षा पाहणंही तितकंच हवहवसं असतं.  काय म्हणता.....? तुम्हालाही खायचा आहे हा डोसा?... तर त्यासाठी तुम्हाला थेट ओडिसा येथे जावं लागणार आहे. याच भागात असणाऱ्या भुवनेश्वर येथे हा डोसा मिळतो. 

2/5

भुवनेश्वरच्या चंद्रशेखरपूर येथे जवळपास दीड वर्षांपूर्वी या पदार्थाची विक्री करण्यास सुरुवात झाली. 

3/5

चार वाटी पीठ वापरत हा डोसा तयार करण्यात येतो. ज्यामध्ये बटाटा, कांदा, टोमॅटो अशा भाज्यांचं मिश्रण भरलं जातं. शिवाय विविध मसाल्यांचीही त्याला जोड असते. 

4/5

अवघ्या पाच मिनिटांमध्ये तयार होणारा हा बाहुबली डोसा, नारळाच्या चटणीसोबत समोर येतो तेव्हा त्याची चव आणखी वाढते. 

5/5

हा डोसा संपवणं हे कोणा एकट्याचं काम नाही. बाहुबली डोसा चारजणांची भूक भागवू शकतो. अवघ्या ७५ रुपयांमध्ये हा डोसा तुमची भूक भागवू शकतो. काय मग, कधी जाताय हा 'बाहुबली डोसा' खायला?