close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

शेतकऱ्याचा आविष्कार; उंच झाडावर चढण्यासाठी यंत्र तयार

कर्नाटकमध्ये राहणाऱ्या एका शेतकऱ्याने अप्रतीम यंत्र तयार केले आहे. या यंत्राच्या मदतीने आपण किताही उंच झाडावर अगदी सहज रित्या चढू शकतो.

Jun 18, 2019, 13:19 PM IST
1/7

नारळ आणि सुपारीची शेती

नारळ आणि सुपारीची शेती

दक्षिण भारत त्याचप्रमाणे देशाच्या पूर्वोत्तर राज्यांमध्ये नारळ आणि सुपारीची शेती मोठ्या प्रमाणात केली जाते. नारळ आणि सुपारीची झाडं जास्त उंच असल्यामुळे त्यांची फळे तोडणे अधिक कठीण होते. त्याचप्रमाणे त्यांच्यावर किटनाशकांची फवारणी करणे देखील कठीण असते. (फोटो सौजन्य-एएनआय)

2/7

झाडावरून नारळ काढणे अतिशय खर्चीक असते

झाडावरून नारळ काढणे अतिशय खर्चीक असते

जगाचा पोशिंदा असलेला शेतकरी आपले जीवन धोक्यात टाकून झाडावर चढतात, पण खरं पाहायला गेल तर हे काम अतिशय खर्चीक आहे.(फोटो सौजन्य-एएनआय)

3/7

सोपे झाले झाडावर चढणे

सोपे झाले झाडावर चढणे

कर्नाटकमध्ये राहणाऱ्या एका शेतकऱ्याने एक अप्रतिम यंत्र तयार केले आहे. या मशीनच्या मदतीने आपण किताही उंच झाडावर अगदी सहज रित्या चढू शकतो. (फोटो सौजन्य-एएनआय)

4/7

शेतकऱ्याने यंत्र तयार केले.

शेतकऱ्याने यंत्र तयार केले.

कर्नाटकच्या गणपती भट्ट नावाच्या शेतकऱ्याने उंच झाडावर चढणाऱ्या मशीनचा शोध लावला आहे. या मशीनच्या माध्यमातून शेतकरी सोप्या पद्धतीने उंच झाडावर चढू- उतरू शकतात.(फोटो सौजन्य-एएनआय)

5/7

झाडावर चढणे अत्यंत धोकादायक

झाडावर चढणे अत्यंत धोकादायक

गणपती भट्ट हे कर्नाटकमधील साजिपामुडा गावातील रहिवासी आहेत. ते म्हणाले की, 'नारळ आणि सुपारीची झाडं अतिशय उंच आणि सपाट असतात. या झाडांवर चढणे अत्यंत धोकादायक असते, पण शेतकऱ्यांची मजबुरी असल्यामुळे त्यांना आपला जीव धोक्यात टाकावा लागतो.' (फोटो सौजन्य-एएनआय)

6/7

साकारण्यात आलेले यंत्र २८ किलोंचे आहे.

साकारण्यात आलेले यंत्र २८ किलोंचे आहे.

शेतकरी गणपती भट्ट यांनी तयार करण्यात आलेली यंत्र २८ किलोंचे आहे. या यंत्रामध्ये टू-स्ट्रोक इंजीन लावण्यात आले आहे. (फोटो सौजन्य-एएनआय)

7/7

सोपे झाले काम

सोपे झाले काम

उंच झाडांवर चढणारे हे यंत्र ८० किलोचे वजन पेलवू शकतो. या यंत्राला ब्रेक देखील लावण्यात आले आहेत. (फोटो सौजन्य-एएनआय)