close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

वडीलांमुळे विनोदी कलाकार होण्याची उमेद झाली जागी - जेमी लिव्हर

दिग्गज कॉमेडियन जॉनी लीव्हर आणि स्टँड-अप कॉमेडियन जेमी लिव्हरने इन्स्टग्रामवर तिचे काही फोटो शेअर केले आहेत.

Apr 15, 2019, 11:42 AM IST

मुंबई : दिग्गज कॉमेडियन जॉनी लीव्हर आणि स्टँड-अप कॉमेडियन जेमी लिव्हरने इन्स्टग्रामवर तिचे काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोंच्या माध्यमातून तिचा अनोखा लूक चाहत्यांसमोर आला आहे. तिचे हे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होताना दिसत आहे.  

1/4

जेमी लिव्हरने एका मुलाखतीत म्हटले, 'माझा जन्म मुंबईत झाला, पण माझ्यातील विनोदी कलाकाराने लंडनमध्ये जन्म घेतला. माझे वडील ब्रिटनच्या दौऱ्याला गेले असताना तेव्हा त्यांनी मला एक स्टँड-अप कॉमेडियन म्हणून संधी दिली.त्यानंतर माझ्यात विनोदी कलाकार होण्याची उमेद जागी झाली.'

2/4

याआधी जेमी एका कंपनीमध्ये मार्केटिंगमध्ये नोकरी करत होती. वडीलांनी सोपावलेल्या जबाबदारी नंतर तिचा विनोदी कलाकार म्हणून प्रवास चालू झाला. जेमी सध्या वडील जॉनी लिव्हर यांच्याकडून अभिनयाचे धडे घेत आहे.

3/4

बहुप्रतिक्षित 'हाऊसफुल ४' चित्रपटात जेमी तिच्या वडीलांसोबत स्क्रिन शेअर करताना दिसणार आहे. 'हाऊसफुल ४' चित्रपटाच्या माध्यमातून हे दोघे मोठ्या पडद्यावर चाहत्यांना पोट धरून हसण्यास भाग पाडणार आहेत. 

4/4

'हाऊसफुल ४' चित्रपटाच्या माध्यमातून अक्षय कुमार, रितेश देशमुख, बॉबी देओल, क्रिती सॅनॉन, पूजा हेगडे अशी एकापेक्षा एका तगडी स्टारकास्ट चाहत्यांचे मनोरंजन करणार आहे.