सेक्स करताना मेल्याचं नाटक करते मादी कोळी, कारण जाणून आश्चर्य वाटेल

माणसांप्रमाणे प्राणी, पक्षी आणि किटकांचंही एक वेगळं जग असतं. ज्याप्रमाणे माणसाने जगण्यासाठी काही नियम आखले आहेत तसेच प्राण्यांचेही नियम आहेत. कोळ्यांच्या काही प्रजातींमध्ये सेक्सनंतर मादी नराची शिकार करते. यामुळे नर कोळी आपलं रक्षण करण्यासाठी वेगवेगळे मार्ग शोधत असतात.   

Apr 06, 2023, 17:33 PM IST
1/6

माणसांप्रमाणे प्राणी, पक्षी आणि किटकांचंही एक वेगळं जग असतं. ज्याप्रमाणे माणसाने जगण्यासाठी काही नियम आखले आहेत तसेच प्राण्यांचेही नियम आहेत. कोळ्यांच्या काही प्रजातींमध्ये सेक्सनंतर मादी नराची शिकार करते. यामुळे नर कोळी आपलं रक्षण करण्यासाठी वेगवेगळे मार्ग शोधत असतात.   

2/6

पण मादी कोळी या जास्त स्मार्ट असतात. असं सांगतात की, मादी कोळी या शरिरसंबंध ठेवताना मेल्याचं नाटक करतात.   

3/6

एका अभ्यासानुसार, फनल कोळी (Funnel Weaving Spiders) सेक्स करताना अजब पद्धतीने वागतात. सेक्स करताना त्या आपण मेलो आहोत असं नाटक करतात. जेणेकरुन नर कोळ्याला आपल्याला मादी कोळीपासून काहीच धोका नाही असं वाटतं. कारण सेक्सनंतर मादी कोळी लगेच नर कोळीला खाऊन टाकते.   

4/6

या कोळींना फ़नल वीवर्स (Funnel weavers) आणि फ़नल वेब स्पाइडर (Funnel web spiders) असंही म्हटलं जातं. या बारीक असतात आणि वेगाने चालतात. या आपलं जाळं फनलच्या आकाराचं बनवतात. हे जाळं अशाप्रकारे बनवलेलं असतं की सेक्सनंतर नर कोळीला मारुन लगेच खाता येईल.   

5/6

त्यातच काही प्रजाती अजब पद्धतीने वागत आहेत. याला सेक्सुअल कैटालेप्सी (Sexual catalepsy) असं म्हटलं जातं. यामध्ये मादी आपले पाय वाकवते आणि स्थिर अवस्थेत राहते. यामुळे ती मेली आहे असं वाटतं. यामुळे नराला आता आपल्यावर हल्ला होणार याची चिंता राहत नाही आणि ते सेक्स करतात.   

6/6

दरम्यान, अभ्यासात मादी जाणुनबुजून अशाप्रकारे वागते की यामागे अन्य कारण आहे हे स्पष्ट होऊ शकलेलं नाही. हा अभ्यास करंट जूलॉजी (Current Zoology) जर्नलमध्ये प्रकाशित करण्यात आला आहे.