अरुण जेटली काळाच्या पडद्याआड

Aug 24, 2019, 13:31 PM IST
1/5

माजी केंद्रीय अर्थमंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते अरूण जेटली यांचे शनिवारी २४ ऑगस्ट रोजी दुपारी १२.०७ मिनिटांनी दिल्लीच्या एम्स रुग्णालयात निधन झाले. ते ६६ वर्षांचे होते. श्वसनाचा त्रास होत असल्याने ९ ऑगस्टपासून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु होते. त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. 

2/5

२०१४ साली नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यानंतर सरकारच्या कारभाराची घडी बसवण्यात अरूण जेटली यांचा मोठा वाटा होता. अडचणीच्या काळात सरकारची बाजू समर्थपणे मांडणारा नेता म्हणून त्यांची ओळख होती. 

3/5

जेटली यांच्या अर्थमंत्रीपदाच्या काळातच नोटाबंदी आणि वस्तू व सेवा कर (जीएसटी) सारखे महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. या निर्णयाच्या अंमलबजावणीतही जेटलींचे महत्त्वपूर्ण योगदान होते.  

4/5

२०१८ मध्ये त्यांच्यावर मूत्रपिंड प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया करण्यात आली होती. यानंतर त्य़ांनी साधारण तीन महिने विश्रांती घेतली होती. या आजारपणातून सावरत असतानाच जेटली यांना पेशीचा कर्करोग असल्याचे निदान झाले होते. यासाठी त्यांनी परदेशात जाऊनही उपचार घेतले होते.

5/5

अरुण जेटली यांच्या जाण्याने देश एका अभ्यासू व संयमी नेता आणि उत्कृष्ट संसदपटूला मुकला असल्याची भावना व्यक्त केली जात आहे.