Friendship Day: बॉलिवूडमधील 'ही' दोस्ती तुटायची नाय...

Aug 02, 2020, 16:56 PM IST
1/6

बॉलिवूडचे दोन सुपरस्टार सलमान आणि शाहरुख खान, यांच्या मैत्रीमध्ये अनेकदा चढ-उतार आल्याचं पाहायला मिळालं. परंतु आजही हे दोघे चांगले मित्र आहेत. या दोघांची मैत्री 'करण-अर्जुन' चित्रपटापासून पाहायला मिळाली.   

2/6

अमिताभ बच्चन आणि धर्मेंद्र यांच्या मैत्रीची चर्चा 'शोले' चित्रपटापासून सुरु झाली. त्यानंतर 'राम बलराम', 'चुपके-चुपके' आणि 'हम कौन हैं' या चित्रपटात बिग बी आणि धर्मेंद्र ही जोडी दिसली. आजही या दोघांची मैत्री कायम आहे.  

3/6

हेमा मालिनी आणि रेखा ही जोडीदेखील बॉलिवूडमधील खास जोडी मानली जाते. हेमा मालिनी आणि रेखा यांनी अनेक चित्रपटात एकत्र काम केलं आहे.  'गोरा और काला', 'जान हथेली पर', 'अपने-अपने' यांसारख्या अनेक चित्रपटात त्यांनी एकत्र भूमिका साकारली आहे. 2010 मध्ये आलेल्या 'शादियां' या चित्रपटातही रेखा आणि हेमा मालिनी ही जोडी एकत्र पाहायला मिळाली होती. 

4/6

सोनम कपूर आणि जॅकलिन या दोघींनी एकाही चित्रपटात एकत्र काम केलेलं नाही. परंतु या दोघीही एकमेकींच्या खास मैत्रिणी आहेत.   

5/6

रणवीर सिंह आणि अर्जुन कपूर ही जोडी 'गुंडे' चित्रपटातून एकत्र पाहायला मिळाली होती. आजही हे दोघे चांगले मित्र असून, अनेकांना दोघे एकत्र मजा-मस्ती करताना पाहायला मिळतात.  

6/6

करिना कपूर-खान आणि अमृता अरोरा ही बॉलिवूडमधील खास मैत्रिणींची जोडी प्रसिद्ध आहे. या दोघींनी रोहित शेट्टी दिग्दर्शित 'गोलमाल 2' मध्ये एकत्र काम केलं होतं. करिना आणि अमृता अनेकदा एकमेकींसोबतचे फोटो शेअर करताना दिसतात. अनेकदा शॉपिंग, डिनर डेट, जिमसाठीदेखील एकत्र पाहायला मिळतात.