सनी देओल 'या' आजाराने होता त्रस्त, म्हणाला 'कोणालाच कळायचं नाही, मला नुसते मारायचे आणि...'

अभिनेता सनी देओल सध्या 'गदर 2' चित्रपटाला मिळालेल्या यशामुळे चर्चेत आहे. दरम्यान, नुकतंच सनी देओलने एका मुलाखतीत असा खुलासा केला आहे, ज्यामुळे सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला आहे.   

Aug 30, 2023, 16:53 PM IST
1/12

अभिनेता सनी देओल सध्या 'गदर 2' चित्रपटाला मिळालेल्या यशामुळे चर्चेत आहे. दरम्यान, नुकतंच सनी देओलने एका मुलाखतीत असा खुलासा केला आहे, ज्यामुळे सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला आहे.   

2/12

सनी देओलने एका मुलाखतीत बोलताना लहानपणी आपण डिस्लेक्सिया आजाराने त्रस्त होतो असा खुलासा केला आहे.   

3/12

डिस्लेक्सिया एक मानसिक आजार आहे, ज्यामध्ये वाचताना, लिहिताना आणि शब्द बोलताना,  लक्षात ठेवताना त्रास होतो.   

4/12

सनी देओलनेही लहानपणी आपल्याला या गोष्टीचा खूप त्रास झाल्याचं सांगितलं आहे. लहानपणी लोकांना माझी ही अडचण समजत नव्हती असं त्याने म्हटलं आहे.   

5/12

सर्वांना सनी देओल अभ्यासात हुशार नाही असं वाटायचं आणि त्यामुळे त्याला मार पडत असे.   

6/12

याबद्दल बोलताना सनी देओलने सांगितलं की, मी डिस्लेक्सिक होतो, पण त्यावेळी कोणालाच हे काय असतं याची माहिती नव्हती.    

7/12

"त्यावेळी मला कानाखाली पडत असे. सगळे म्हणायचे अभ्यास जमत नाही, हा माठ आहे", असं सनी देओलने सांगितलं.   

8/12

सनीने सांगितलं की, आजही मला लिहिताना, वाचताना त्रास होतो. काही अक्षरं मला वेगळीच दिसतात.   

9/12

अभिनेत्याने सांगितलं की, 'डिस्लेक्सियामुळे तो अनेकदा सेटवर टेलिप्रॉम्पटरवरुन वाचणं टाळायचो. माझे डायलॉग मी स्वत:च बोलण्यावर भर देतो'.  

10/12

पण डिस्लेक्सिया असतानाही लहानपणी आपला IQ लेव्हल फार चांगला होता असंही सनीने सांगितलं आहे. सनीने सांगितलं की "माझा IQ फार चांगला होता. शाळेत चाचणी झाली असता माझा IQ 160 पेक्षा अधिक होता".  

11/12

दरम्यान सनीने आपल्याला लोकांमध्ये बोलताना त्रास होतो, त्यामुळे करिअरच्या सुरुवातीला मी बोलणं टाळायचो असंही सांगितलं आहे.   

12/12

फक्त सनी देओलच नाही तर अभिषेक बच्चन, ह्रतिक रोशन यांनाही लहानपणी डिस्लेक्सियाचा सामना करावा लागला आहे. दोघांनीही जाहीरपणे याबद्दल सांगितलं होतं.