विवाह सोहळ्यात आता कांद्याचा हार आणि भेट वस्तू ही कांदाच

Dec 14, 2019, 11:24 AM IST
1/6

कांद्याचे दर गगनाला भिडलेले असताना, वाराणसी इथे चक्क लग्नामध्ये फुलांचे हार घालण्याऐवजी कांदा आणि लसणाच्या माळा वधू-वरांनी एकमेकांना घातल्या. इतकच नाही तर, वऱ्हाडी मंडळींना भेटवस्तू म्हणून कांदा आणि लसूण देण्यात आले. सध्या वाराणसीमध्ये कांद्याचे दर हे ८० ते ९० रूपये किलोच्या घरात आहेत.

2/6

वाराणसीमधील साकेत नगर येथील विवाहसोहळ्यात एक वेगळंच वातावरण पाहायला मिळालं. वधू-वराने चक्क कांदा आणि लसून पासून बनलेला हार एकमेकांना घालून संसाराच्या सुरुवात केली. 

3/6

वेगवेगळ्या प्रकारे लोकं कांदा भाववाढीचा विरोध करत असताना लग्न सोहळ्यात ही हा एक वेगळा प्रयोग पाहायला मिळाला. 

4/6

कांद्यावरुन टिकटॉक व्हिडिओ व्हायरल होत असताना आता चक्क सत्य घटनेतही कांदा येऊ लागला आहे. काही मित्रांनी लग्नात चक्क कांदा भेट दिला आहे. यानंतर उपस्थितांमध्ये एकच हसू सुटलं. 

5/6

सोशल मीडियावर ही सध्या याचीच चर्चा आहे. कांदा इतका महागला आहे की, लोकं वेगवेगळ्या पद्धतीने याचं रिअॅक्ट होत आहेत.

6/6

जोबीरभूम येखील प्रतिक कर्मकार आणि प्रत्युषा सहा यांच्या विवाह सोहळ्यात कांदा हा चर्चेचा विषय बनला. हे दोघेही बँकेत कामाला आहेत. वधूच्या मित्रांची कांदाभेट पाहून हसू आवरत नसताना वराच्या मित्रांनी देखील कांदा भेट दिला. उपस्थिताच्या डोळ्यात पाणी आलं पण कांदा कापल्यामुळे नाही तर हसून हसून.