रक्षाबंधनसाठी बहिणींना द्या बजेटमध्ये बसणारी 'ही' स्मार्ट भेट

रक्षाबंधन हा भावंडांचा सण काही दिवसांवर येवून ठेवला आहे. 

Aug 12, 2019, 15:25 PM IST

मुंबई : रक्षाबंधन हा भावंडांचा सण काही दिवसांवर येवून ठेवला आहे. या राखीच्या निमित्ताने भाऊ-बहीण आयुष्यभर एकमेकांना जपण्याचा निर्धार दृढ करतात. रक्षाबंधन म्हणजे भाऊ-बहिणीचा दिवस. या दिवश प्रत्येक भाऊ आपल्या लाडक्या बहिणीला काहीतरी भेट वस्तू देतो. पण या भेट वस्तूची निवड करताना मात्र भाऊरायांची चांगलीच तारांबळ उडते. तर तुमच्या बजेटमध्ये अगदी सहज बसणारे स्मार्टफोन तुम्ही तुमच्या बहिणीला नक्की देऊ शकता. ई-कॉमर्स संकेतस्थळ अॅमेझॉनवर सॅमसंग Galaxy M Series स्मार्टफोनवर २ हजार ६०० रूपयांपर्यंत रक्षाबंधन निमित्त विशेष सवलत देण्यात आली आहे. एचडीएफसी बँकेच्या डेबीट कार्डचा उपयोग केल्यास आणखी ५ टक्के सूट मिळणार आहे. त्याचप्रमाणे ६ महिने कोणत्याही प्रकारचा व्याजदर आकारला जाणार नाही.

1/4

One Plus 7

One Plus 7

शिवाय One Plus 7 स्मार्टफोनवर सुद्धा विशेष सवलत मिळत आहे. रक्षाबंधनच्या दिवशी बहिणीला भेट देण्यासाठी प्रती महिना १६ हजार रूपयांच्या  EMI वर हा फोन उपलब्ध आहे. एचडीएफसी बँकेच्या डेबिड कार्डचा उपयोग केल्यास आणखी ५ टक्के सूट मिळणार आहे.  

2/4

Samsung Galaxy M30

Samsung Galaxy M30

Samsung Galaxy M30 स्मार्टफोनमध्ये ४ जीबी रॅम आणि ६४ जीबी इंटर्नल मेमरी आहे. या फोनमध्ये प्राईम मेंबर्स यांना २ हजार ५०० रूपयांची सूट देण्यात आली आहे. म्हणजे १६ हजार ४९० रूपयांचा फोन १३ हजार ९९० रूपयांत घेता येणार आहे. 

3/4

Samsung Galaxy M10

Samsung Galaxy M10

Samsung Galaxy M10 फोनवर १ हजार ३०० रूपयांची सूट मिळणार आहे. ९ हजार २९० रूपयांचा फोन ७ हजार ९९० रूपयांमध्ये मिळत आहे. या स्मार्टफोन मध्ये ३ जीबी रॅम आणि ३२ जीबी इंटर्नल मेमरी आहे. 

4/4

Samsung Galaxy M20

Samsung Galaxy M20

Samsung Galaxy M20 फोनवर १ हजार ४०० रूपयांची सूट मिळत आहे. १३ हजार ३९० रूपयांचा फोन ११ हजार ९९० रूपयांमध्ये मिळत आहे. फोनमध्ये ४ जीबी रॅम आणि ६४ जीबी इंटर्नल मेमरी आहे. १४ ऑगस्टपर्यंत स्मार्टफोन घरपोच करण्यात येणार आहेत.