PF Balance Check करण्याचे 4 सोपे मार्ग, घरी बसून घेऊ शकता माहिती !

मुंबई : जर आपल्या पगारामधून पीएफ अर्थात भविष्य निर्वाह निधी  (Provident Fund) कापून जात असेल तर आपल्यासाठी ही बातमी फार महत्वाची आहे. आम्ही तुम्हाला सांगत आहोत की तुम्ही घरी बसून आपल्या पीएफ खात्याचा बॅलन्स चेक करु शकता. अगदी सोप्या मार्गाने पीएफ तापसून शकता. हे काम घरून काही मिनिटांत केले जाऊ शकते.

| Feb 22, 2021, 20:56 PM IST
1/4

जर आपला मोबाइल नंबर आपल्या पीएफ खात्यासह ईपीएफओ (EPFO) रेकॉर्डमध्ये लिंक असेल तर आपण केवळ मिस कॉलद्वारेच पीएफ जाणून घेऊ शकता. यासाठी 011-22901406 वर आपल्याला मिस कॉल करावा लागेल. कॉल कट झाल्यानंतर काही सेकंदांनंतर, तुम्हाला एक संदेश मिळेल, ज्यात तुमच्या खात्यात जमा झालेल्या रकमेची माहिती असेल.

2/4

पीएफ खात्यातील शिल्लक एसएमएसद्वारे देखील करता येते. यासाठी तुम्हाला 7738299899 या मोबाईल क्रमांकावर एसएमएस करावा लागेल. जर आपला नंबर नोंदणीकृत असेल तर आपल्याला लवकरच एक संदेश मिळेल, ज्यात आपल्या खात्यात जमा झालेल्या रकमेची माहिती असेल.

3/4

पीएफ खातेधारकांना https://passbook.epfindia.gov.in/MemberPassBook/Login वर लॉग इन करून त्यांच्या खात्याची स्थिती देखील जाणून घेऊ शकता. यासाठी आधी यूएएन आणि पासवर्ड वापरुन लॉग इन करावे लागेल आणि त्यानंतर पासबुकवर जाऊन शिल्लक बॅलन्स जाणून घेऊ शकता.

4/4

पीएफ खात्यातील शिल्लक जाणून घेण्यासाठी आपल्याला प्ले स्टोअर किंवा अ‍ॅप स्टोअरवरून उमंग अॅप डाऊनलोड करावे लागेल. या अ‍ॅपवर बर्‍याच सरकारी सेवा उपलब्ध आहेत. यामध्ये ईपीएफओ पर्याय निवडल्यानंतर तुम्हाला 'कर्मचारी केंद्रीत सेवा' निवडावी लागेल. यूएएन नंबर प्रविष्ट केल्यानंतर आपल्या नोंदणीकृत मोबाइल क्रमांकावर एक ओटीपी येईल, ज्याद्वारे आपण व्ह्यू पासबुकवर जाऊन पीएफ बॅलन्स तपासू शकता.