मॅपचं काय घेऊन बसलात आता गरजूंना 'पोट भरण्यासाठी गुगल मदत करणार'

Google mapचा पुरेपूर वापर सर्वजण करतात. पण आता गरजूंना पोट भरण्यासाठी देखील गुगल मदत करणार आहे ऐकून आश्चर्य वाटलं ना? पण हो गुगलने नुकतच एक टूल लाँच केलं आहे. गुगलचा हा उपक्रम फूड फॉर गुड टीमचा एक भाग आहे. हे पूर्वी प्रोजेक्ट डेल्टा म्हणून ओळखलं जायचं.

Jun 29, 2021, 23:11 PM IST
1/5

सिलिकॉन व्हॅली: जगातील सर्वात मोठी टेक कंपन्यांपैकी एक, गुगलला केवळ इंटरनेटचा अभिमान नाही, तर यामुळे लोकांचे जीवन अनेक मार्गांनी सुकर केलं. कंपनी याच कंपनीनं आणखी एक टूल लाँच केलं. या टूलद्वारे गरजू लोकांपर्यंत खाद्यपदार्थ पोहोचवू शकणार आहे. या भागामध्ये गुगलने फूड सपोर्ट टूल लॉन्च केलं. जे खूप उपयुक्त आहे.  

2/5

Find Food Support असं नाव दिलं आहे.  यामध्ये फूड लोकेटर टूल देण्यात आलं आहे. कंपनीने आपल्या ब्लॉगमध्ये दिलेल्या माहितीनुसार गुगल मॅपद्वारे हे टूल जोडण्यात आलं आहे. त्यामुळे गुगल मॅपची मदत घेऊन युझर या टूलचा वापर अगदी सहज करू शकतो. फूड पँट्री, शाळा, किंवा लँच प्रोग्रॅम्स देखील हे टूल सर्च करणार आहे.   

3/5

 No Kid Hungry आणि FoodFinder अशा दोन संकल्पना एकत्र आणण्यावर गुगलकडून सध्या भर देण्यात येत आहे. अमेरिकेतील 50 राज्यात 90,000 ठिकाणी हे टूल सपोर्ट करणार आहे. 

4/5

कोरोनामुळे अमेरिकेत लोकांचे खूपच खाण्या-पिण्याचे हाल झाले. त्यामुळे त्यांच्यासाठी या टूलचा मोठा फायदा होणार आहे. शिवाय लहान मुलांना देखील याचा फायदा घेता यावा असा गुगलचा प्रयत्न आहे. 

5/5

गुगलच्या म्हणण्यानुसार तुम्हाला यासोबत लोकेशनही जोडावं लागणार आहे. हे फीचर लवकरच संपूर्ण जगात येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.