close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

मुलींकडे आकर्षित झाल्यामुळे 'या' दिग्दर्शकाचं अभ्यासाकडे दुर्लक्ष

बालपणापासूनच त्याला विज्ञानामध्ये विशेष रस होता.

Sep 10, 2019, 12:53 PM IST

मुंबई : बॉलिवूडचे प्रसिद्ध दिग्दर्शक आणि निर्माता म्हणून ओळख असलेल्या अनुराग कश्यपचा आज ४७ वा वाढदिवस आहे. बालपणापासूनच त्याला विज्ञानामध्ये विशेष रस होता. भविष्यात वैज्ञानिक होण्याची त्याची इच्छा होती. परंतू मित्रांच्या सल्ल्यामुळे तो रंगभूमीकडे वळला. रंगभूमीचा प्रवास त्याला आंतरराष्ट्रीय स्तरापर्यंत घेवून गेला. अनुराग कश्यपच्या वाढदिवसा निमित्त त्याच्या जीवनाशी निगडीत असलेल्या काही खास गोष्टी..

1/9

उत्तर प्रदेशात झाला जन्म

उत्तर प्रदेशात झाला जन्म

उत्तर प्रदेशच्या गोरखपूर मध्ये १० सप्टेंबर रोजी त्यांचा जन्म झाला. त्याचे वडील इलेक्ट्रिसिटी बोर्डमध्ये मुख्य अभियंता म्हणून कार्यरत होते. त्यांच्या सततच्या बदल्यांमुळे अनुरागचे बालपण अनेक नव्या शहरांमध्ये गेले. 

2/9

देहरादून आणि ग्वॉलियरमध्ये घेतले शालेय शिक्षण

देहरादून आणि ग्वॉलियरमध्ये घेतले शालेय शिक्षण

देहरादूनच्या ग्रीन विद्यालय आणि ग्वॉलियमधील सिंधिया शाळेतून त्याचे शालेय शिक्षण पूर्ण झाले. त्यानंतर त्याला दिल्लीमधील 'हंसराज महाविद्यालयात' पाठवण्यात आले. 

3/9

अभ्यासात नव्हते लागत मन

अभ्यासात नव्हते लागत मन

एका मुलाखती दरम्यान त्यांनी त्याच्या जीवनातील मजेदार क्षणाचा खुलासा केला. महाविद्यालयीन जीवनात मुलींमुळे त्याचे अभ्यासातून दुर्लक्ष झाले. मुलींना अकर्षित करण्यासाठी तो अनेक मार्गांचा अवलंब करायला लागला होता. 

4/9

इंग्रजी विषयात त्याचे ज्ञान अधिक प्रगल्भ होते.

इंग्रजी विषयात त्याचे ज्ञान अधिक प्रगल्भ होते.

इंग्रजी भाषेचे ज्ञान अधिक असल्यमुळे तो शालेय जीवनात हिंदी शिकण्यासाठी तासंतास वाचनालयात घालवत असत. त्यानंतर महाविद्यालयात त्याने इंग्रजी भाषेची पुस्तकं वाचण्यास सुरूवात केली. अशाप्रकारे अभ्यासात पुन्हा त्याचा रस वाढला. 

5/9

जेव्हा पथनाट्य साकारण्याची मिळाली संधी

जेव्हा पथनाट्य साकारण्याची मिळाली संधी

दरम्यान, दिल्लीतील ‘जन नाट्य’शी संबंधित मित्र सुनीत सिन्हाने अनुरागला रंगभूमीमध्ये अभिनय करण्याचा सल्ला दिला. यानंतर त्याला पथनाट्य करण्याची संधी मिळाली.

6/9

नाटकांची तिकीटं सुद्धा विकली

नाटकांची तिकीटं सुद्धा विकली

प्रसिद्ध 'तनवीर ग्रुप' सोबत काम करण्यासाठी त्याला फार मेहनत घ्यावी लागली. त्यासाठी त्याने श्रीराम सेंटरवर नाटकांची तिकीटं देखील विक्री केली.   

7/9

'पांच' चित्रपटाच्या माध्यमातून त्याने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले.

'पांच' चित्रपटाच्या माध्यमातून त्याने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले.

दिग्दर्शकाच्या रूपात त्याने बॉलिवूडमध्ये आपले पाऊल ठेवले. परंतू आतापर्यंत हा चित्रपट रूपेरी पडद्यावर दाखल झालेला नाही.   

8/9

'गॅंग ऑफ वासेपूर' चित्रपटाच्या माध्यमातून मिळाली लोकप्रियता

'गॅंग ऑफ वासेपूर' चित्रपटाच्या माध्यमातून मिळाली लोकप्रियता

२०१२ मध्ये प्रदर्शित झालेल्या 'गॅंग ऑफ वासेपूर' चित्रपटाच्या माध्यातून तो प्रकाशझोतात आला. त्यानंतर अनेक चित्रपट त्याने दिग्दर्शित केले आणि त्या चित्रपटांना चाहत्यांकडून पसंती सुद्धा मिळाली. 

9/9

नुकताच ट्विटर अकाउंट डिलीट केले.

नुकताच ट्विटर अकाउंट डिलीट केले.

अनेक सामाजिक मुद्द्यांवर बेधडक मत मांडणाऱ्या अनुरागने त्याचे ट्विटर अकाउंट डिलीट केले आहे. सामाजिक मुद्द्यांवर मतं मांडल्यामुळे त्याच्या कुटुंबाला अनेक धमक्यांचा सामना करावा लागत आहे.