close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

...या कारणांमुळे आशा - लता दीदींमध्ये वाद

आशा भोसलेंच्या आयुष्यात गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांची भूमिका फार मोलाची होती. 

Sep 08, 2019, 09:52 AM IST

मुंबई : ‘केव्हा तरी पहाटे’, ‘मलमली तारुण्य माझे’, ‘तरुण आहे रात्र अजुनी’, ‘मी मज हरपून बसले गं’आशा भोसले यांचा स्वर लाभलेली ही गाणी आजही लोकप्रिय आहेत. अष्टपैलू गायिका आशा भोसले यांचा आज वाढदिवस आहे. 'गोल्डन आशा' अशी सुद्धा ओळख असलेल्या आशा भोसलेंनी १६ हजार पेक्षा जास्त गण्यांना आपला आवाज दिला आहे. आयुष्यात अनेक अडचणींना सामोरे जात कलाविश्वात त्यांनी स्वत:चं मानाचं स्थान निर्माण केले आहे. व्यवसायिक त्याचप्रमाणे व्ययक्तिक जीवनात त्यांनी अनेक चढ उतार पाहिले आहेत. आशा भोसलेंच्या आयुष्यात गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांची भूमिका फार मोलाची होती. पण काही कारणांमुळे या बहिणींच्या नात्यात दुरावा आला. 

1/6

...या कारणांमुळे आशा - लता दीदींमध्ये वाद

...या कारणांमुळे आशा - लता दीदींमध्ये वाद

लता मंगेशकर यांनी वयाच्या अवघ्या १४ वर्षापासून काम करण्यास सुरूवात केली. वडिलांच्या अकस्मित निधनानंतर संपूर्ण जबाबदारी एकट्या लता दीदींच्या खांद्यावर आली. घरातील मोठ्या बहिणीची जबाबदारी त्यांनी उत्तम रित्या पार पाडली. 

2/6

...या कारणांमुळे आशा - लता दीदींमध्ये वाद

...या कारणांमुळे आशा - लता दीदींमध्ये वाद

परंतू, आशा भोसले यांना कोणत्याही प्रकार बंधनात राहायला आवडत नसल्यामुळे त्यांनी स्वत:चा मार्ग अवलंबला. १६ वर्षात त्यांनी लता मंगेशकरांच्या सेक्रेटरी सेबत लग्न केले. त्यावेळेस गणपतराव ३१ वर्षांचे होते. 

3/6

...या कारणांमुळे आशा - लता दीदींमध्ये वाद

...या कारणांमुळे आशा - लता दीदींमध्ये वाद

एका मुलाखती दरम्यान खुद्द आशा भोसले यांनी या गोष्टीचा खुलासा केला होता. लता मंगेशकर यांनी त्यांच्या आणि गणपतराव यांच्या लग्नाला मंजूरी न दिल्यामुळे दोघी बहिंणीमध्ये वाद होऊ लागले. त्यानंतर आशा भोसले यांनी आपल्या कुटुंबासोबत सर्व संबंध तोडून सुखी संसाराची सुरूवात केली. 

4/6

...या कारणांमुळे आशा - लता दीदींमध्ये वाद

...या कारणांमुळे आशा - लता दीदींमध्ये वाद

परंतू त्यांचे हे नातं फार काळ टिकू शकले नाही. त्यांना तीन मुले आहेत. आशा भोसले आणि गणपतराव विभक्त झाल्यानंतर देखील दोघी बहिणींच्या नात्यात गोडवा कधी आलाच नाही. 

5/6

...या कारणांमुळे आशा - लता दीदींमध्ये वाद

...या कारणांमुळे आशा - लता दीदींमध्ये वाद

त्यानंतर त्यांनी आर.डी.बर्मन यांच्यासोबत लग्न गाठ बांधली. त्यांचे याआधी देखील एक लग्न झाले होते. त्यांची पहिली पत्नी रिता पटेल आणि आर.डी.बर्मन यांचा घटस्फोट झाला होता. आशा भोसले आणि आर. डी. बर्मन यांच्या संगीत प्रेमाने त्यांना एकत्र आणले. सहावर्ष लहान बर्मन यांनी त्यांना लग्नासाठी मागणी घातली. 

6/6

...या कारणांमुळे आशा - लता दीदींमध्ये वाद

...या कारणांमुळे आशा - लता दीदींमध्ये वाद

१९८० साली हे दोन संगीत प्रेमी विवाह बंधनात अडकले. काही दिवसांनंतर मात्र बर्मन यांनी जगाचा निरोप घेतला. परंतू आशा भोसलेंचा संगीत प्रवास कायम संगीतमय राहिला.