48 खोल्यांच्या आलिशान वाड्यात राहतो क्रिकेटचा बादशाह, 'प्रिन्स ऑफ कोलकाता'च्या घरसमोर अंबानींचे घरही फिके; बघा झलक

Published: Jul 08, 2026, 11:56 AM IST|Updated: Jul 08, 2026, 11:56 AM IST

'ईडन गार्डन्सचा महाराजा' आणि या क्रिकेटरच्या घराचा 44 वर्षांचा संबंध आहे. आज या दिगज्जाचा 54 वा वाढदिवस आहे. यानिमित्ताने त्याच्या ४८ खोल्यांच्या एका भव्य घराचे फोटो बघा. 

 

Sourav Ganguly Behala House 1/8

भारतीय क्रिकेटला आक्रमक नेतृत्वाची नवी दिशा देणाऱ्या सौरव गांगुली यांचा ८ जुलै रोजी वाढदिवस असतो. मैदानावरील धाडसी निर्णयांमुळे 'प्रिन्स ऑफ कोलकाता' म्हणून ओळख मिळवलेल्या गांगुलींची जीवनशैलीही तितकीच चर्चेत असते. कोलकात्यातील त्यांचा भव्य पुश्तैनी वाडा आजही त्यांच्या कुटुंबाच्या समृद्ध वारशाची साक्ष देतो.

 

Sourav Ganguly Behala House 2/8

सौरव गांगुली यांचं हे निवासस्थान तब्बल ४८ खोल्यांचं असून, त्याची गणना शहरातील सर्वात प्रतिष्ठित खासगी घरांमध्ये केली जाते. अनेक दशकांचा इतिहास असलेल्या या वास्तूमध्ये गांगुली कुटुंब आजही एकत्र वास्तव्यास आहे. पारंपरिक बंगाली स्थापत्यशैली, जुन्या काळातील सजावट आणि सांस्कृतिक वारसा जपणारी रचना या घराचं खास आकर्षण मानली जाते.

 

Sourav Ganguly Behala House 3/8

गांगुलींचा जन्म उद्योगविश्वाशी संबंधित कुटुंबात झाला. त्यांचे वडील चंडीदास गांगुली हे कोलकात्यातील प्रसिद्ध उद्योगपती होते. घरचा व्यवसाय सांभाळण्याची संधी असतानाही सौरव यांनी क्रिकेटची वाट निवडली. 

 

Sourav Ganguly Behala House 4/8

बंगालकडून सातत्यपूर्ण कामगिरी करत त्यांनी भारतीय संघात स्थान मिळवलं आणि पुढे संघाचं नेतृत्वही केलं. त्यांच्या नेतृत्वाखाली भारतीय क्रिकेटला नवी ओळख मिळाली.

 

Sourav Ganguly Behala House 5/8

या भव्य घराचा एक भाग त्यांनी आधुनिक कार्यालयासाठी राखून ठेवला आहे. क्रिकेट प्रशासनाशी संबंधित कामकाज, व्यावसायिक बैठका आणि विविध महत्त्वाचे निर्णय याच ठिकाणी घेतले जातात. त्यामुळे हे घर केवळ निवासस्थान नसून त्यांच्या व्यावसायिक आयुष्याचंही महत्त्वाचं केंद्र आहे.

 

Sourav Ganguly Behala House 6/8

गांगुलींच्या घरातील डायनिंग एरिया देखील तितकाच आकर्षक आहे. क्रिकेट, उद्योग आणि मनोरंजन क्षेत्रातील अनेक मान्यवर त्यांच्या घरी पाहुणचारासाठी येत असतात. प्रशस्त डायनिंग रूम आणि देखणा इंटिरियर या घराच्या ऐश्वर्यात आणखी भर घालतात.

 

Sourav Ganguly Behala House 7/8

कोलकात्यातील या ऐतिहासिक निवासस्थानासोबतच सौरव गांगुली यांच्याकडे लंडनमध्येही एक फ्लॅट असल्याचं सांगितलं जातं. त्यांच्या स्थावर मालमत्तेची किंमत कोट्यवधी रुपयांमध्ये असल्याचे विविध माध्यमांतील अहवालांमध्ये नमूद करण्यात आले आहे.

 

Sourav Ganguly Behala House 8/8

क्रिकेटमधील यश, राजेशाही वारसा आणि साधेपणाचा संगम असलेलं सौरव गांगुली यांचं व्यक्तिमत्त्व आजही चाहत्यांसाठी तितकंच प्रेरणादायी आहे. मैदानावर प्रतिस्पर्ध्यांना आव्हान देणारा 'दादा' घराच्या बाबतीतही आपल्या परंपरा आणि संस्कृती जपताना दिसतो.