Tejashri Pradhan Birthday: "तिचा ‘अनुराग’ म्हणून मला माहित..." तेजश्री प्रधानच्या वाढदिवसानिमित्त अंकुश चौधरीची खास पोस्ट

Published: Jun 02, 2026, 02:16 PM IST|Updated: Jun 02, 2026, 02:16 PM IST

Tejashri Pradhan Birthday: मराठी इंडस्ट्रीमधील लोकप्रिय अभिनेत्री तेजश्री प्रधानचा आज 38 वा वाढदिवस आहे. या निमित्ताने अंकुश चौधरीने खूपच खास पोस्ट केली आहे. 

 

Tejashri Pradhan Birthday1/8

मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री तेजश्री प्रधान आज २ जून रोजी तिचा वाढदिवस साजरा करत आहे. मालिका, चित्रपट आणि नाटकांमधून स्वतःची वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या तेजश्रीवर चाहत्यांसह अनेक कलाकारांकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. 

 

Tejashri Pradhan Birthday2/8

अशातच अभिनेता अंकुश चौधरीने सोशल मीडियावर एक खास पोस्ट शेअर करत तिला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

 

Tejashri Pradhan Birthday3/8

अंकुशने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर ‘ती सध्या काय करते’ या गाजलेल्या चित्रपटातील एक संस्मरणीय व्हिडीओ शेअर केला. या व्हिडीओसोबत त्याने दिलेल्या कॅप्शनने चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे.

 

Tejashri Pradhan Birthday4/8

पोस्टमध्ये अंकुशने लिहिले, “'ती सध्या काय करते?' हा प्रश्न आजही अनेकांना पडतो. पण तिचा ‘अनुराग’ म्हणून मला एवढंच माहिती आहे की, ती आजही प्रेक्षकांच्या मनात अधिराज्य गाजवत आहे.” 

 

Tejashri Pradhan Birthday5/8

पुढे त्याने तेजश्रीच्या मैत्रीबद्दल भावना व्यक्त करत, “तुझी मैत्री आजही तितकीच जिव्हाळ्याची आणि हक्काची आहे. तुझा नेहमीच अभिमान वाटतो,” असे म्हटले. पोस्टच्या शेवटी त्याने ‘तुझा अनुराग, अन्या’ अशी खास सहीही केली.

 

Tejashri Pradhan Birthday6/8

अंकुश चौधरी आणि तेजश्री प्रधान यांनी ‘ती सध्या काय करते’ या चित्रपटात एकत्र काम केले होते. दिग्दर्शक सतीश राजवाडे यांच्या या चित्रपटात दोघांनी साकारलेली अनुराग आणि तन्वी ही पात्रे प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस उतरली होती. त्यांच्या मैत्री, प्रेम आणि भावनिक नात्याची कथा आजही अनेकांच्या मनात घर करून आहे.

 

Tejashri Pradhan Birthday7/8

२०१७ मध्ये प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाला जवळपास दशक पूर्ण होण्याच्या मार्गावर असतानाही त्याची लोकप्रियता कायम आहे. चित्रपटातील गाणी, संवाद आणि कलाकारांची केमिस्ट्री आजही सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरते.

 

Tejashri Pradhan Birthday8/8

दरम्यान, तेजश्री प्रधान सध्या झी मराठी वाहिनीवरील ‘वीण दोघांतली ही तुटेना’ या मालिकेत मुख्य भूमिकेत दिसत आहे. तिच्या स्वानंदी या पात्रालाही प्रेक्षकांकडून उत्तम प्रतिसाद मिळत असून मालिकेची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे.