Birthday Special: तब्बूच्या बहिणीसोबतचे लग्न सहा वर्षांनंतर मोडले, नंतर रशियन मॉडेलशी लग्न; टीव्हीवरील 'हनुमान'ची प्रेमकथा खूपच फिल्मी

Published: May 06, 2026, 08:05 AM IST|Updated: May 06, 2026, 08:05 AM IST

Actor Love Story: या अभिनेत्याचे 1996 मध्ये तब्बूची बहीण आणि अभिनेत्री फराह नाझशी पहिले लग्न केले होते, पण हे नाते फार काळ टिकले नाही. त्यानंतर विंदूला पुन्हा प्रेम गवसले ते एका  रशियन मॉडेलमध्ये... 

 

vindu dara singh birthday1/9

विंदू दारा सिंह 6 मे रोजी आपला वाढदिवस साजरा करत आहे आणि आज ते 62 वर्षांचे झाले आहेत. या खास दिवशी त्यांच्या आयुष्यातील महत्त्वाच्या घडामोडी जाणून घेऊयात... 

vindu dara singh birthday2/9

विंदू दारा सिंह हे दिग्गज दारा सिंह यांचे सुपुत्र असून त्यांनी अभिनय क्षेत्रात स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली. ‘जय वीर हनुमान’ मालिकेतील त्यांच्या भूमिकेमुळे ते घराघरात प्रसिद्ध झाले.

 

vindu dara singh birthday3/9

विंदू यांनी 1996 मध्ये अभिनेत्री फराह नाज हिच्याशी विवाह केला. ती तब्बू यांची बहीण असून दोघांची भेट चित्रपटाच्या सेटवर झाली होती आणि तिथूनच त्यांच्या नात्याची सुरुवात झाली.

 

vindu dara singh birthday4/9

काही वर्षांच्या रिलेशनशिपनंतर त्यांनी लग्न केले आणि 1997 मध्ये त्यांच्या घरी मुलाचा जन्म झाला. त्या काळात दोघांची जोडी बॉलिवूडमध्ये चर्चेत होती.

 

vindu dara singh birthday5/9

मात्र, सततचे वाद आणि मतभेद यामुळे त्यांचे नाते बिघडत गेले. अखेर सहा वर्षांतच त्यांचे वैवाहिक आयुष्य संपले आणि 2002 मध्ये त्यांनी वेगळे होण्याचा निर्णय घेतला.

 

vindu dara singh birthday6/9

लग्नानंतर डीना यांनी मॉडेलिंग सोडून व्यवसाय क्षेत्रात स्वतःची ओळख निर्माण केली. आज त्या ब्यूटी ब्रँड, सॅलून, स्पा आणि ट्रेनिंग अकॅडमी चालवत यशस्वी उद्योजिका बनल्या आहेत.

 

vindu dara singh birthday7/9

पहिल्या लग्नानंतर काही काळाने विंदू यांच्या आयुष्यात पुन्हा प्रेम आले. यावेळी ते रशियन मॉडेल डीना उमारोवा यांच्या प्रेमात पडले.

 

vindu dara singh birthday8/9

विंदू आणि डीना यांचे नाते हळूहळू घट्ट झाले आणि त्यांनी 2006 मध्ये विवाह केला. त्यांच्या लग्नाची चर्चा त्या काळात खूप झाली होती.

 

vindu dara singh birthday9/9

या दाम्पत्याला अमेलिया नावाची मुलगी असून ते एकत्र आनंदी कौटुंबिक आयुष्य जगत आहेत. तसेच त्यांनी ‘नच बलिए 6’ या रिअॅलिटी शोमध्येही एकत्र सहभाग घेतला होता.