Shafali Verma: शेफाली वर्माकडे आली मोठी जबाबदारी! महिला आयोगाने 'या' गोष्टीसाठी केली नियुक्ती

Haryana State Commission for Women: हरियाणा महिला आयोगाने 2026सालासाठी विश्वविजेती महिला क्रिकेटपटू शेफाली वर्माला (World Cup Winner Shafali Verma) एका खास कामासाठी नियुक्त करण्याचा निर्णय घेतला आहे.   

Tejashree Gaikwad | Nov 08, 2025, 11:18 AM IST
twitter
1/8

शेफाली वर्मा ब्रँड अ‍ॅम्बेसेडर

 Shafali Verma as Brand Ambassador for 2026

हरियाणा महिला आयोगाने प्रसिद्ध युवा क्रिकेटपटू शेफाली वर्मा हिला वर्ष 2026 साठी आपली ब्रँड अ‍ॅम्बेसेडर म्हणून निवडण्याचा निर्णय घेतला आहे. आयोगाचा हा निर्णय केवळ सन्मान नसून राज्यातील मुलींना स्वतःवर विश्वास ठेवून मोठी स्वप्ने पाहण्यास प्रेरित करणारा आहे.  

twitter
2/8

वडिलांना दिली माहिती

 Shafali Verma as Brand Ambassador for 2026

 शेफाली वर्मा आज भारतीय महिला क्रिकेट संघातील सर्वात तेजस्वी आणि धडाडीच्या फलंदाजांपैकी एक मानली जाते. छोट्या शहरातून आलेल्या आणि घरगुती वातावरणात संघर्ष करत उभी राहिलेली ही खेळाडू आज लाखो तरुणींसाठी आदर्श बनली आहे.

twitter
3/8

कुटुंबाचे अभिनंदन

 Shafali Verma as Brand Ambassador for 2026

हरियाणा महिला आयोगाच्या अध्यक्षा रेणु भाटिया यांनी शेफालीच्या वडिलांना फोन करून ही माहिती दिली तसेच कुटुंबाचे अभिनंदनही केले. त्यांनी सांगितले की, आयोगाचा उद्देश समाजात ‘बेटी बोझ नाही, अभिमान आहे’ हा संदेश अधिक दृढ करणे आहे.   

twitter
4/8

सर्व कुटुंबांसाठी संदेश देणारी जिद्द

 Shafali Verma as Brand Ambassador for 2026

शेफालीने लहानपणी संघर्षाचा सामना करत, अनेक पूर्वग्रहांना मागे टाकत जागतिक क्रिकेटमधील आपला ठसा उमटवला आहे. तिची ही जिद्द आणि कामगिरी राज्यातील सर्व कुटुंबांसाठी संदेश देणारी आहे की, मुली संधी मिळाल्यास अगदी कुठल्याही क्षेत्रात चमकू शकतात.

twitter
5/8

या आधी कोण होतं ब्रँड अ‍ॅम्बेसेडर?

 Shafali Verma as Brand Ambassador for 2026

यापूर्वी 2024 मध्ये मनू भाकर यांना महिला आयोगाचा ब्रँड अ‍ॅम्बेसेडर बनवण्यात आले होते. आता ही परंपरा पुढे नेण्यात येत असून, शेफालीची निवड ही त्या संकल्पनेचा सुसंगत पुढचा टप्पा मानला जात आहे. आयोगाच्या मते, ब्रँड अ‍ॅम्बेसेडर ही केवळ औपचारिक पदवी नसून, समाजातील मुलींना संवाद, मार्गदर्शन आणि प्रेरणा देण्याचा एक जिवंत मंच आहे.

twitter
6/8

काय म्हणाला रेणु भाटिया

 Shafali Verma as Brand Ambassador for 2026

रेणु भाटिया यांनी स्पष्ट केले,"शेफालीसारख्या मुली समाजाचे भविष्य उज्ज्वल करत आहेत. त्यांच्या यशामुळे अशा कुटुंबांना धैर्य मिळते जे मुलींच्या क्षमतेबद्दल शंका घेतात."

twitter
7/8

वडिलांची प्रतिक्रिया

 Shafali Verma as Brand Ambassador for 2026

शेफालीचे वडील संजीव वर्मा यांनीही या निर्णयावर आनंद व्यक्त करत सांगितले की, मुलीला दिलेला हा सन्मान संपूर्ण कुटुंबासाठी आणि त्यांच्या गावासाठी अभिमानाची गोष्ट आहे. शेफाली जेव्हा रोहतकला परत येईल तेव्हा महिला आयोगाची टीम तिच्या घरी भेट देणार आहे.  

twitter
8/8

प्रेरणादायी कथा

 Shafali Verma as Brand Ambassador for 2026

ही घोषणा राज्यात महिला सक्षमीकरण, क्रीडा शिक्षण, लैंगिक समानतेचा प्रसार आणि बेटी बचाओ-बेटी पढाओ सारख्या उपक्रमांना आणखी बळ मिळवून देणार आहे. शेफालीची मैदानावरील धग, जिद्द आणि निडरपणा आजच्या पिढीसाठी एक प्रेरणादायी कथा ठरते.  

twitter