LPG सिलेंडरच्या होम डिलिवरीची सिस्टम 1 नोव्हेंबरपासून बदलणार

Oct 16, 2020, 14:14 PM IST
1/4

काय आहे कारण

काय आहे कारण

सूत्रांच्या माहितीनुसार, हे पाऊल सिलेंडरच्या होणाऱ्या चोरीमुळे उचलण्यात आलं आहे. सिलेंडर चोरी थांबवण्यासाठी नवीन सिस्टम लागू होणार आहे.  तेल कंपन्या LPG सिलेंडरसाठी नवीन डिलिवरी सिस्टम लागू करणार आहे.

2/4

काय आहे नवीन सिस्टम

काय आहे नवीन सिस्टम

सूत्रांच्या माहितीनुसार तेल कंपन्यांनी नवीन सिस्टमला डिलिव्हरी ऑथेंटिकेशन कोड (डीएसी) शी जोडण्याची योजना आखली आहे. यामध्ये सिलिंडर बुक केल्यावर तुमच्या नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावर एक कोड येईल. हा कोड सिलिंडरच्या डिलीवरी वेळी डिलिव्हरी बॉयला द्यावा लागतो. जोपर्यंत हा कोड दाखवला जात नाही, तोपर्यंत वितरण पूर्ण होणार नाही आणि स्थिती अपूर्ण राहिल.

3/4

मोबाईल नंबर होणार अपडेट

मोबाईल नंबर होणार अपडेट

जर आपला मोबाईल क्रमांक गॅस विक्री एजन्सीकडे नोंदणीकृत नसेल किंवा जर नंबर बदलला असेल तर तुम्हाला तो अपडेट करावा लागेल. यासाठी डिलिव्हरी बॉयला app देण्यात येणार आहे. डिलिव्हरीच्या वेळी आपण त्या अॅपच्या मदतीने तुमचा मोबाईल नंबर डिलिव्हरी बॉयकडून अपडेट करू शकता. अॅपद्वारे मोबाईल नंबर ओटीपी द्वारे अपडेट होईल.

4/4

स्मार्ट सिटीमध्ये होणार लागू

स्मार्ट सिटीमध्ये होणार लागू

तेल कंपन्या प्रथम 100 स्मार्ट शहरांमध्ये ही नवीन वितरण प्रणाली लागू करणार आहे. पथदर्शी प्रकल्प म्हणून हा राबवला जाईल. हळूहळू तीच पद्धत देशाच्या इतर भागात राबविली जाईल. सध्या ही यंत्रणा दोन शहरांमध्ये पायलट प्रकल्प म्हणून कार्यरत आहे. नवीन सिस्टीम फक्त घरगुती एलपीजी सिलिंडरवर लागू होईल. यापासून व्यावसायिक सिलिंडर वगळले आहेत.