Driving License एक्सपायर झाल्यावर किती दिवसांपर्यंत Valid राहतं? 'हे' नियम तुम्हाला माहित असायला हवेत

Driving License : भारतात कोणतेही वाहन चालवण्यासाठी RTO कडून त्याचा अधिकृत परवाना घेणं आवश्यक असतं. वाहन परवाना काढण्यासाठी काही परीक्षा द्याव्या लागतात. त्यात तुम्ही पास झालात की तुम्हाला वाहन परवाना म्हणजेच ड्रायविंग लायसेन्स मिळतो. ड्रायविंग लायसेन्स विषयी रिन्यूअल विषयी अधिक माहिती जाणून घेऊयात. 

Pooja Pawar | Mar 17, 2025, 07:08 PM IST
1/7

भारतात ड्रायविंग लायसेन्स जास्तीत जास्त 40 वर्षांपर्यंतच व्हॅलिड राहतात. लायसेन्सची व्हॅलिडिटी संपल्यावर तुम्हाला ते रिन्यू करण्यासाठी अप्लिकेशन करावं लागतं. असं केलं नाहीत तर तुमचं लायसेन्स पर्मनंट कॅन्सल होऊन जातं. 

2/7

ड्रायविंग लायसेन्सची एक्स्पायरी डेट संपल्यावर ते रिन्यू करण्यासाठी वेळ दिला जातो. तुम्हाला ड्रायविंग लायसेन्सची एक्स्पायरी डेट संपल्यावर ते रिन्यू करण्यासाठी 30 दिवसांचा कालावधी दिला जातो.   

3/7

ड्रायविंग लायसेन्सची एक्स्पायरी झाल्यावर 30 दिवसांच्या कालावधीपर्यंत जर तुम्ही ते रिन्यू केलंत तर तुम्हाला एक्स्ट्रा चार्ज भरावा लागत नाही. ड्रायविंग लायसेन्स करण्यासाठी जवळपास 400 रुपये आकारले जातात. 

4/7

ड्रायविंग लायसेन्सची एक्स्पायरी झाल्यावर 30 दिवसांच्या कालावधीपर्यंत जर तुम्ही ते रिन्यू करण्यासाठी अप्लिकेशन केलं नाहीत तर तुम्हाला त्यासाठी लेट फी भरावी लागते. ड्रायविंग लायसेन्सची एक्स्पायरी डेट झाल्यावर ते एक  महिन्यापर्यंत जर तुम्ही त्यासाठी अप्लिकेशन केलं नाही तर ते रिन्यू करण्यासाठी 1500 रुपयांपर्यंत रक्कम भरावी लागते. 

5/7

मोटर व्हीकल एक्ट नुसार जर कोणत्या व्यक्तीने ड्रायविंग लायसेन्सची एक्सपायरी डेट निघून गेल्याच्या वर्षभरानंतर रिन्यू करण्यासाठी अप्लिकेशन केले तर त्याचे अप्लिकेशन स्वीकारले जात नाही आणि ड्रायविंग लायसेन्स रद्द होऊन जातं. 

6/7

एकदा ड्रायविंग लायसेन्स कॅन्सल झाल्यावर  तुम्हाला पुन्हा एकदा लायसेन्स काढण्यासाठी अप्लिकेशन करावं लागतं. म्हणजे तुम्हाला पुन्हा नव्याने ड्रायविंग लायसेन्स काढण्याची प्रोसेस करावी लागते, त्यानंतरच तुम्हाला नवं ड्रायविंग लायसेन्स मिळतं. 

7/7

ड्रायव्हिंग लायसन्स रिन्यू करण्यासाठी काही महत्त्वाच्या कागदपत्रांची आवश्यकता असते. यात फॉर्म 9 पूर्णपणे भरलेला असणे गरजेचे असून त्यावर तुमची सही केलेली असावी. मूळ ड्रायव्हिंग लायसन्सची कॉपी गरजेची आहे. ड्राइव्हरचे वय 40 पेक्षा अधिक असल्यास फॉर्म 1 ए सोबत मेडिकल सर्टिफिकेट असणे गरजेचे असते. तसेच पासपोर्ट साइज फोटो, वय व पत्त्याचा पुरावा देणे आवश्यक असतं.