IPL Umpire Salary: आयपीएलमध्ये पंचांना किती पगार मिळतो? एका सिजनची कमाई ऐकून बसेल धक्का!

IPL Umpire Salary: आयपीएलमध्ये खेळाडूंशिवाय पंचांचीही महत्त्वाची भूमिका असते. पण तुम्हाला माहित आहे का की या कामासाठी पंचांना किती पगार मिळतो?   

तेजश्री गायकवाड | Mar 21, 2025, 09:36 AM IST

IPL Umpire Salary: आयपीएलमध्ये खेळाडूंशिवाय पंचांचीही महत्त्वाची भूमिका असते. पण तुम्हाला माहित आहे का की या कामासाठी पंचांना किती पगार मिळतो? 

 

1/7

IPL Umpire Salary: आयपीएलमध्ये खेळाडूंशिवाय पंचांचीही महत्त्वाची भूमिका असते. पण तुम्हाला माहित आहे का की या कामासाठी पंचांना किती पगार मिळतो?   

2/7

पंचांचीही महत्त्वाची भूमिका

इंडियन प्रीमियर लीग अर्थात आयपीएलचा 18वा सीझन लवकरच सुरू होणार आहे. या लीगमध्ये खेळणाऱ्या खेळाडूंची किंमत आपल्याला माहीतच आहे.  आयपीएलमध्ये खेळाडूंशिवाय पंचांचीही महत्त्वाची भूमिका असते. पण तुम्हाला माहित आहे का की पंचांना सामन्यात किती पगार मिळतात?

3/7

सर्व पंचांचे पगार वेगवेगळे

आयपीएलमधील सर्व पंचांचे पगार वेगवेगळे असतात. जगातील या सर्वात महागड्या क्रिकेट लीगमधील पंचांचा पगार हा पंचाला किती अनुभव आहे आणि तो साखळी सामन्यांमध्ये किंवा बाद फेरीतील सामन्यांमध्ये अंपायरिंग करतोय यावर अवलंबून आहे.

4/7

कशाचे आधारे वेतन दिले जाते?

आयपीएलमध्ये पंचांना अनुभव आणि सामन्यांच्या आधारे वेतन दिले जाते. अनिल चौधरी हे आयपीएलमधील सर्वात जुन्या पंचांपैकी एक आहेत आणि त्यांना 100 हून अधिक सामन्यांमध्ये अंपायरिंग करण्याचा अनुभव आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, अनिल चौधरीला प्रत्येक सामन्यासाठी 1,98,000 रुपये मानधन मिळते.  

5/7

अनुभवी पंच

आयपीएलच्या अनुभवी पंचांमध्ये अनिल चौधरी, नितीन मेनन आणि ब्रूस ऑक्सनफोर्ड यांसारख्या नावांचा समावेश आहे. या पंचांना प्रत्येक सामन्यासाठी 1,98,000 रुपयांपर्यंत मानधन दिले जाते. त्याच वेळी, कमी अनुभवी पंचांना प्रत्येक सामन्यासाठी सुमारे 59,000 रुपये दिले जातात.

6/7

पंचांची एकूण कमाई

आयपीएल हंगामातील पंचांची एकूण कमाई त्यांच्या अनुभवावर आणि सामन्यांच्या संख्येवर अवलंबून असते. एका हंगामात पंच सरासरी 7,33,000 रुपये कमवू शकतात.  

7/7

अतिरिक्त बोनस

आयपीएल प्लेऑफ सामन्यांदरम्यान पंचांना अतिरिक्त बोनसही दिला जातो. हा बोनस त्यांच्या एकूण कमाईत आणखी वाढ करतो, ज्यामुळे अनुभवी पंचांना एका हंगामात भरीव रक्कम अर्थात अतिरिक्त बोनस मिळू शकते.