MR. India मधील Satish Kaushik यांच्या भूमिकेला 'कॅलेंडर' नाव कसे मिळाले?

Satish Kaushik यांची Mr. India चित्रपटातील कॅलेंडर या भूमिकेनं प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं. पण जेव्हा प्रेक्षतकांनी चित्रपट पाहिला तेव्हा सगळ्यांना चित्रपटातील नोकराचे नाव ऐकूण हसायला आलं होतं. अनेकांना प्रश्न होता की कॅलेंडर असं नाव त्या पात्राला कसं काय दिलं? तुम्हालाही प्रश्न पडला असेल तर ही स्टोरी नक्कीच वाचा...

Mar 09, 2023, 12:29 PM IST

How Satish Kaushik got Calender Name in Mr India Movie: बॉलिवूड चित्रपटांमध्ये आपल्या सगळ्यांना कॉमेडीनं खिळवून ठेवणारा कलाकार म्हणून सतीश कौशिक (Satish Kaushik) ओळखले जात होते. सतीश कौशिक यांनी वयाच्या 66 वर्षी अखेरचा श्वास घेतला. गुरुग्राम येथे त्यांच्या मित्रांसोबत होळी साजरी केल्यानंतर मित्राच्या घरी असताना त्यांना अस्वस्थ वाटू लागले होते. दरम्यान, त्यांना रुग्णालयात घेऊन जात होते. दरम्यान, गाडीतच त्यांना हृदयविकाराचा झटका आला. त्यांच्या निधनाची बातमी त्यांचे जवळचे मित्र अनुपम खेर यांनी दिली. (Satish Kaushik Death News) 

 

1/7

How Satish Kaushik got Calender Name in Mr India Movie

सतीश कौशिक यांनी आजवर 100 पेक्षा अधिक चित्रपटांमध्ये काम केले. पण सगळ्यांच्या लक्षात राहिलेली त्यांची भूमिका म्हणजे मिस्टर इंडिया या चित्रपटातील कॅलेंडर ही भूमिका. या भूमिकेमुळे ते प्रकाश झोतात आले हे म्हणायला काही हरकत नाही. 

2/7

How Satish Kaushik got Calender Name in Mr India Movie

तुम्हाला सगळ्यांना हे जाणून आश्चर्य वाटेल की मिस्टर इंडिया या चित्रपटासाठी सतीश कौशिक यांनी सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम केले आहे. सहाय्यक दिग्दर्शन करत असतानाच दुसऱ्या बाजुला सतीश हे चित्रपटासाठी ऑडिशनही घेत होते. 

3/7

How Satish Kaushik got Calender Name in Mr India Movie

ऑडिशन घेताघेता सतीश कौशिक यांना अभिनय करण्याची इच्छा झाली. आता अभिनय करायचा विचार तर सतीश कौशिक यांच्या डोक्यात आला अशात कोणती ठरावीक भूमिका करण्याची त्यांची इच्छा नव्हती. 

4/7

How Satish Kaushik got Calender Name in Mr India Movie

त्यानंतर सतीश कौशिक यांना कळलं की चित्रपटात नोकराची भूमिका आहे. मग आता ही भूमिका करण्याचं तर सतीश कौशिक यांनी ठरवलं पण ती भूमिका कशी मिळवायची यावर ते विचार करू लागले. 

5/7

How Satish Kaushik got Calender Name in Mr India Movie

सतीश कौशिक यांच्या मनात ती भूमिका करण्याची इच्छा होती. त्यामुळे जे पण लोक या भूमिकेसाठी ऑडिशन द्यायला यायचे त्यांना सतीश कौशिक काहीतरी कारण सांगत नकार द्यायचे आणि अखेर त्यांनी ही भूमिका साकारण्याची इच्छा व्यक्त केली.  ही भूमिका मिळाली आणि सतीश कौशिक यांनी त्यांच्या अभिनयातून सगळ्यांची मने जिंकली.

6/7

How Satish Kaushik got Calender Name in Mr India Movie

नोकराच्या भूमिकेला काय नाव द्यायचं असा विचार सुरु असताना, सतीश कौशिक यांना त्यांच्या लहानपणीची एक गोष्ट आठवली. सतीश कौशिक यांच्या वडिलांना भेटायला एक व्यक्ती यायची, त्यावेळी ते प्रत्येक वाक्यात कॅलेंडर हा शब्द वापरायचे. 

7/7

How Satish Kaushik got Calender Name in Mr India Movie

कॅलेंडर हा शब्द सतीश कौशिक यांच्या लक्षात राहिला आणि त्यांनी या भूमिकेला 'कॅलेंडर'हे नाव दिलं. अशा प्रकारे मिस्टर इंडिया या चित्रपटतील सतीश कौशिक यांच्या भूमिकेला 'कॅलेंडर' हे नाव मिळाले.