Jamun Buying Tips: जांभूळ गोड आहे की नाही कसं ओळखायचं? खरेदीपूर्वी जाणून घ्या टिप्स

Published: Jul 02, 2026, 03:12 PM IST|Updated: Jul 02, 2026, 03:12 PM IST

बाजारात भरपूर प्रमाणात जांभूळ आले आहेत. पण त्यातले नेमके गोड जांभूळ कोणते आहेत हे कसं ओळखायचं याबद्दल अधिक माहिती आणि टिप्स जाणून घ्या. 

 

 

 

1/8

उन्हाळा आणि पावसाळ्याच्या दिवसांत बाजारात जांभळांची मोठ्या प्रमाणात आवक सुरू होते. चवदार आणि पौष्टिक मानले जाणारे हे फळ लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडते. मात्र, अनेकदा दिसायला आकर्षक असलेली जांभळे खरेदी केल्यानंतर ती आंबट किंवा बेचव निघतात आणि सगळाच हिरमोड होतो.

 

2/8

पण काही सोप्या गोष्टी लक्षात ठेवल्या, तर जांभूळ चाखण्याची गरज न पडता गोड, रसाळ आणि उत्तम दर्जाची जांभळे निवडणे अगदी सोपे होऊ शकते.

 

रंगावरून ओळखा पिकलेली जांभूळ3/8

रंगावरून ओळखा पिकलेली जांभूळ

चांगली पिकलेली जांभूळ साधारणपणे गडद जांभळ्या किंवा काळपट रंगाची असतात. फिकट जांभळा, गुलाबी किंवा हिरवट छटा असलेली फळे पूर्णपणे पिकलेली नसण्याची शक्यता असते. अशा जांभळांचा स्वाद तुलनेने अधिक आंबट असू शकतो.

अतिचमकदार जांभळांपासून सावध राहा4/8

अतिचमकदार जांभळांपासून सावध राहा

बाजारात अनेकदा फळे ताजी दिसावीत म्हणून त्यावर पाण्याचा फवारा मारला जातो. त्यामुळे ती अधिक चमकदार दिसतात. मात्र, नैसर्गिक आणि हलकी चमक असलेली जांभळे निवडणे अधिक योग्य ठरते.

आकारही सांगतो चव5/8

आकारही सांगतो चव

खूप लहान किंवा सुरकुतलेली जांभळे टाळावीत. मध्यम किंवा मोठ्या आकाराच्या जांभळांमध्ये गराचे प्रमाण अधिक असते. त्यामुळे अशी फळे अधिक गोड, रसाळ आणि खाण्यास स्वादिष्ट असतात.

हाताला जाणवणारा पोत महत्त्वाचा6/8

हाताला जाणवणारा पोत महत्त्वाचा

जांभूळ हलक्या हाताने दाबून त्याची गुणवत्ता तपासता येते. खूप कडक फळ कच्चे असण्याची शक्यता असते, तर अतिशय मऊ किंवा दाबलेले फळ जास्त पिकलेले किंवा खराब होण्याच्या मार्गावर असू शकते. किंचित मऊसर आणि टवटवीत जांभूळ खरेदी करणे उत्तम मानले जाते.

देठावरून कळते ताजेपणा7/8

देठावरून कळते ताजेपणा

जांभळाचा देठ हा त्याच्या ताजेपणाचा महत्त्वाचा संकेत असतो. हिरवा आणि ताजा दिसणारा देठ म्हणजे फळ नुकतेच झाडावरून तोडले गेले असण्याची शक्यता जास्त असते. याउलट कोरडा किंवा तपकिरी झालेला देठ जुनी जांभळे असल्याचे दर्शवू शकतो.

सुगंधही देतो गोडीचा अंदाज8/8

सुगंधही देतो गोडीचा अंदाज

चांगल्या पिकलेल्या जांभळांमधून हलका गोडसर आणि ताजा सुगंध येतो. जर फळांमधून आंबट किंवा विचित्र वास येत असेल, तर अशी जांभळे घेणे टाळावे. नैसर्गिक सुगंध असलेली जांभळे सहसा अधिक ताजी आणि चविष्ट असतात.