जगातील सर्वात बारिक नदी! लांबी तब्बल 17 किमी, रुंदी फक्त 15 सेंटीमीटर

जगभरात अनेक नद्या वाहतात. जगातील सर्वात बारीक नदी चीनमध्ये आहे. 

Feb 13, 2024, 16:34 PM IST

Hualai River : नदी पार करायची म्हंटली की दोनच पर्याय असतात. एक तर पोहत जायचे किंवा होडीने. मात्र, जगात एक अशी नदी जी अगदी उडी मारुन देखील पार करता येवू शकते.  हुआलाई असे जगातील सर्वात बारीक नदीचे नाव आहे. 

1/7

नाईल नदी ही जगातील सर्वात लांब नदी आहे. हुआलाई ही जगातील सर्वात बारिक नदी आहे.  

2/7

मंगोलियन पठारावरुन वाहणाऱ्या या नदीची परिसर अतिशय सुंदर दिसते. येथील हिरवगारं गवताळ कुरण  नदीच्या सौंदर्यात भर घालते.

3/7

भूगर्भातील झऱ्यापासून ही नदी प्रवाहित झाली आहे. हेग्झिगेटन गवताळ प्रदेशातील दलाई नूर तलावाला ही नदी मिळते. 

4/7

हुलाई नदी 17 किलोमीटर लांब आहे. मात्र, या नदीची रुंदी फक्त 15 सेमी आहे.  एका वळणावर या नदीची रुंदी फक्त 4 सेमी इतकी आहे.   

5/7

हुआलाई नदीचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे ही नदी  जगातील सर्वात बारिक नदी आहे. लांब उडी मारुन नदीच्या पलीकडे जाता येते. यामुळेच लहान मुलं देखील ही नदी अगदी सहज पार करु शकतात. 

6/7

जवळपास 10 हजार वर्षांपासून ही नदी वाहत आहे. यामुळे ही अत्यंत प्राचीन नदी आहे. 

7/7

 हुआलाई नदी ही चीनमध्ये आहे. उत्तरी चीनमध्ये ही नदी वाहते.