वर्ल्ड कपदरम्यान इंग्लंड संघाला मोठा धक्का, स्पर्धा सुरु असतानाच स्टार खेळाडूने घेतली निवृत्ती

ICC World Cup 2023 : आयसीसी विश्वचषक 2023 स्पर्धेत इंग्लंडची कामगिरी अगदीच सुमार झाली आहे. 2019 मध्ये विश्वचषक उंचावणारा हा संघ यंदाच्या विश्वचषकात थेट तळाला आहे. त्यातच आता इंग्लंड संघाला आणखी एक धक्का बसला आहे. संघातील स्टार खेळाडूने तडकाफडकी निवृत्तीची घोषणा केली आहे.

| Nov 01, 2023, 18:13 PM IST
1/7

वर्ल्ड कपस्पर्धेत गतविजेत्या इंग्लंड संघाची अवस्था खूपच बिकट झाली आहे. पॉईंटटेबलमध्ये इंग्लंड तळाला म्हणजे दहाव्या स्थानावर आहे. नेदरलँड, अफगाणिस्तानही इंग्लंडपेक्षा वरच्या स्थानावर आहेत.

2/7

इंग्लंडने आतापर्यंत खेळलेल्या सहा सामन्यात केवळ एकच सामना जिंकला आहे. गेल्याच सामन्यात भारताने इंग्लंडचा शंभर धावांनी पराभव केला होता.

3/7

इंग्लंड संघाची कामगिरी निराशाजनक होत असतानाच आता संघाला आणखी एक धक्का बसला आहे. इंग्लंडचा स्टार ऑलराऊंडर डेविड विलीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे.

4/7

डेव्हिड विलीने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत निवृत्तीची घोषणा केली. विश्वचषक स्पर्धेतनंतर डेविड विली आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त होणार आहे. 

5/7

विश्वचषकात इंग्लंडच्या वाईट कामगिरीने डेविड विली निराश आहे. 'हा दिवस कधीच येऊ नये असं आपल्याला वाटत' असं,  विलीने आपल्या पोस्टमध्ये म्हटलंय. खूप विचार केल्यानंतर आपण हा निर्णय घेत असल्याचंही विलीने म्हटंलय.

6/7

आपल्या पोस्टमध्ये विलीने कुटुंबाचेही आभार मानले आहेत. पत्नी, दोन मुलं, आई आणि वडिलांच्या पाठिंब्याशिवाय आपलं स्वप्न पूर्ण करणं अशक्य होतं, असंही विलीने म्हटलं आहे. 

7/7

33 वर्षांचा वेगवान गोलंदाज डेविड विली 70 आंतरराष्ट्रीय एकदिवसीय क्रिकेट सामने आणि 43 टी20 आंतरराष्टीय सामने खेळला आहे.