...तर IPL नव्हे ICL ने रचला असता भारताच्या टी-20 फ्रँचायजी क्रिकेटचा पाया, सुरु होण्याआधीच का गुंडाळली स्पर्धा?
Indian Cricket League : इंडियन प्रीमियर लीगचा सध्या 19 वा सीजन सुरु आहे. आयपीएलने क्रिकेटमध्ये खूप मोठ्या प्रमाणात व्यापारीकरण करण्यास मदत केली. ज्यामुळे भारतीय क्रिकेट नियामक मंडळ जगातील सर्वात श्रीमंत क्रीडा संस्थेपैकी एक बनलं आहे. पण खूप कमी जणांना ठाऊक असेल की भारतात व्यावसायिक टी20 लीगची सुरुवात ही आयपीएलनने नव्हे तर इंडियन क्रिकेट लीगने झाली होती. मात्र ती स्पर्धा नंतर अनेक खटले, कायदेशीर लढाया आणि खेळातील राजकारणामुळे बंद पडल्याची चर्चा झाली. तेव्हा आयसीएलबद्दल जाणून घेऊयात.

2007 ते 2009 या काळात खेळली गेलेली इंडियन क्रिकेट लीग ही 50 ओव्हर्सच्या स्वरूपातील खाजगी, फ्रेंचायझी शैलीतील टी20 लीगचा एक महत्वाचा भाग होता. रणजी ट्रॉफीसारख्या पारंपरिक फर्स्ट क्लास क्रिकेट आणि राज्यस्तरीय स्पर्धांच्या तुलनेत ही एक मथु उडी होती. सुरुवातीला आयसीएलमध्ये सर्वकाही होतं. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरातील खेळाडू, भव्यता आणि विविध शहरांमध्ये खेळवण्यात आलेले सामने. पण यात आयपीएल सारखे ऑक्शन नव्हते.


भारताचे माजी कर्णधार कपिल देव हे आयसीएलचे ब्रँड ॲम्बेसेडर म्हणूनही कार्यरत होते. शिवाय आयसीएलच्या कार्यकारी मंडळात टोनी ग्रेग, डीन जोन्स आणि किरण मोरे यांसारख्या इतर माजी क्रिकेटपटूंचा समावेश होता. मात्र आयसीएलच्या दोन हंगामानंतर 2009 च्या अखेरीस आयपीएलचे कामकाज बंद पडले. त्यानंतर ही स्पर्धा आयोजित करण्यात आली नाही. आयसीएल बंद होण्यामागचे प्रमुख कारण हे बीसीसीआयचं होतं.

बीसीसीआय ही ती बंद करणारी प्रमुख शक्ती होती, कारण त्यांच्या मते आयसीएल ही एक अनधिकृत 'बंडखोर' लीग होती, जी भारतीय क्रिकेटवरील संस्थेच्या मक्तेदारीला धोका निर्माण करत होती. बीसीसीआयने आयसीएलला मान्यता देण्यास नकार दिला आणि सहभागी खेळाडूंना बीसीसीआय-संचालित सर्व देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून बंदी घातली. त्यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेमार्फत (आयसीसी) इतर राष्ट्रीय मंडळांवरही असेच करण्यासाठी दबाव आणला. बीसीसीआयने आयसीएलशी असलेल्या संबंधांमुळे कपिल देव यांना राष्ट्रीय क्रिकेट अकादमीमधील त्यांच्या पदावरूनही काढून टाकले.

आयसीएल या स्पर्धेत शहरावर आधारित भारतीय संघ आणि आयसीएल वर्ल्ड संघ देखील होते ज्यात लाहोर बादशाह आणि ढाका वॉरियर्स या पाकिस्तानी आणि बांगलादेशी संघांचा समावेश सुद्धा होता. आयसीएलमध्ये देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय खेळाडूंचे मिश्रण होते. आयसीएलने पहिला टी20 सीजन नोव्हेंबर 2007 मध्ये सुरु केला. जो चंदीगजवळील पंचकुला येथे खेळला गेला आणि मग इतर ठिकाणी त्याचा विस्तार झाला. 2007-08 ची टी20 इंडियन चॅम्पियनशिप चेन्नई सुपरस्टार्स संघाने जिंकली.


आयसीएलचे एकूण दोन सीजन खेळवण्यात आले मात्र 2009 च्या अखेरीस आयसीएलचे कामकाज बंद पडले. त्यानंतर कोणतीही स्पर्धा आयोजित केली गेली नाही. बीसीसीआय ही आयसीएल बंद पडण्यामागची एक शक्ती होतीच, कारण त्यांच्या मते आयसीएल ही अनधिकृत बंडखोर लीग होती. जी भारतीय क्रिकटवरील संस्थेच्या मक्तेदारीला धोका निर्माण करत होती.

बीसीसीआयने आयसीएलला मान्यता देण्यास नकार दिला आणि त्यात सहभागी होणाऱ्या खेळाडूंवर बीसीसीआय प्रशासित सर्व देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून बंदी घातली. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेमार्फत (आयसीसी) इतर राष्ट्रीय मंडळांवरही असेच करण्यासाठी दबाव आणला. आयसीएलशी असलेल्या संबंधांमुळे बीसीसीआयने कपिल देव यांना राष्ट्रीय क्रिकेट अकादमीमधील त्यांच्या पदावरूनही काढून टाकले.
