तुम्हालाही सतत फेक व Spam कॉल येतात का? या Guidelines लक्षात ठेवा!

आज काल फेक कॉल्सचे प्रमाण वाढत आहे. स्कॅमर्स लोकांना फसवण्यासाठी विविध प्रकारे युजर्सचा खासगी डेटा चोरण्याचा प्रयत्न करतात. यात बँकिंग फ्रॉड, खोटे बक्षीस, लॉटरी जिंकणे यासारखे आमिष दाखवले जातात.

| Dec 29, 2024, 13:41 PM IST

आज काल फेक कॉल्सचे प्रमाण वाढत आहे. स्कॅमर्स लोकांना फसवण्यासाठी विविध प्रकारे युजर्सचा खासगी डेटा चोरण्याचा प्रयत्न करतात. यात बँकिंग फ्रॉड, खोटे बक्षीस, लॉटरी जिंकणे यासारखे आमिष दाखवले जातात.

1/8

तुम्हालाही सतत फेक व Spam कॉल येतात का? या Guidelines लक्षात ठेवा!

If you are also getting fake calls then just follow these guidelines

 तुम्हालादेखील वारंवार फेक कॉल्स किंवा स्पॅम कॉल येतात कर घाबरण्याची काही गरज नाही. यापासून वाचण्यासाठी या काही गाईडलाइनचे पालन करा. 

2/8

अननोन नंबरवरुन येणाऱ्या कॉलबाबत नेहमी सतर्क राहा. जेव्हा कॉल करणारा व्यक्ती स्वतःला बँक, सरकारी अधिकारी किंवा मोठ्या कंपनीचा प्रतिनिधी समजत असेल तर त्याच्याबाबतची अधिक माहिती घ्या. 

3/8

खासगी माहिती देऊ नका

कोणत्याही कॉलवर कधीच बँक अकाउंट नंबर, ओटीपी, डेबिट,क्रेडिट कार्ड डिटेल्स किंवा आधार कार्ड नंबर यासारखी खासगी माहिती शेअर करु नका. कोणत्याही अधिकृत संस्थान याप्रकारची खासगी माहिती मागत नाहीत. 

4/8

ऑफर आणि बक्षीस

फेक कॉल्स नेहमी तुम्ही लॉटरी किंवा बक्षीस जिंकला आहात असा दावा केला जातो. याबाबत खातरजमा न करता कधीच विश्वास ठेवू नका. 

5/8

कॉल ब्लॉक करा

फेक कॉल्स नेहमी तुम्ही लॉटरी किंवा बक्षीस जिंकला आहात असा दावा केला जातो. याबाबत खातरजमा न करता कधीच विश्वास ठेवू नका. 

6/8

मोबाइलमध्ये असलेले कॉल ब्लॉकिंग फीचरचा वापर करा. Truecaller सारख्या अॅप्सची मदत घेऊन संशयास्पद नंबरची ओळख तपासा आणि मग ब्लॉक करा. 

7/8

जर तुम्हाला वाटलं की एखादा कॉल फेक आहे तर तुम्ही तो रेकॉर्ड करु शकता. या कॉलला 1909 (DND हेल्पलाइन) किंवा सायबर क्राइम पोर्टल वर रिपोर्ट करा.  (https://cybercrime.gov.in)

8/8

 जर तुम्ही चकून तुमची खासगी माहिती शेअर केली असेल तर लगेचच तुमच्या बँकेत फोन करुन सूचना द्या. तुमचं बँक अकाउंट लॉक करा आणि नवीन पासवर्ड सेट करा.