वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये टीम इंडियाचं स्थान निश्चित

चौथ्या कसोटी सामन्यात इंग्लंडला 25 धावांनी पराभूत करून टीम इंडियाने शानदार विजय मिळवला. या विजयासह भारताने चार सामन्यांची कसोटी मालिका 3-1 अशी जिंकली. हा विजय टीम इंडियासाठी ही खास आहे कारण आज भारताने इंग्लंड विरोधात मॅच जिंकून वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये आपले स्थान निश्चित केले आहे. चौथ्या कसोटीत इंग्लंडने टीम इंडियाशी स्पर्धा करण्याचा प्रयत्न केला पण या 'नायकां'मुळे यजमान संघाचे वर्चस्व राहिले आणि तीन दिवसांत हा सामना भारताने जिंकला. या विजयाचे नायक कोण आहेत ते पाहूया.

Mar 06, 2021, 18:55 PM IST

मुंबई : चौथ्या कसोटी सामन्यात इंग्लंडला 25 धावांनी पराभूत करून टीम इंडियाने शानदार विजय मिळवला. या विजयासह भारताने चार सामन्यांची कसोटी मालिका 3-1 अशी जिंकली. हा विजय टीम इंडियासाठी ही खास आहे कारण आज भारताने इंग्लंड विरोधात मॅच जिंकून वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये आपले स्थान निश्चित केले आहे. चौथ्या कसोटीत इंग्लंडने टीम इंडियाशी स्पर्धा करण्याचा प्रयत्न केला पण या 'नायकां'मुळे यजमान संघाचे वर्चस्व राहिले आणि तीन दिवसांत हा सामना भारताने जिंकला. या विजयाचे नायक कोण आहेत ते पाहूया.

1/5

ऋषभ पंत

ऋषभ पंत

टीम इंडियाचा स्टार विकेटकीपर आणि बॅट्समन ऋषभ पंत (Rishabh Pant)याने आज टीम इंडियासाठी दिमाखदार खेळी खेळली. सध्या अहमदाबादमध्ये सुरु असलेल्या इंग्लंड विरुध टेस्ट मॅचमध्ये धमाकेदार अंदाजात त्याने शतक पूर्ण केलं. ऋषभ पंतने त्याच्या टेस्ट करियरमधील हे तिसरे शतक मारले आहे.

2/5

वाशिंगटन सुंदर

वाशिंगटन सुंदर

ऋषभ पंत पाठोपाठच वॉशिंगटन सुंदरने (Washington Sundar)सुद्धा दमदार कामगिरी केली. त्याने 117 बॅलमध्ये 60 रन पूर्ण करत आपले योगदान दिले. दुसऱ्या दिवशीही तो अप्रतीम खेळी खेळला आणि मॅच संपेपर्यंत तो नाबाद राहिला. सुंदरने 174 बॅलमध्ये नाबाद 96 रन केले, परंतु टिम ऑल आउट झाली म्हणुन त्याला शतक पूर्ण करता आले नाही.  

3/5

रविचंद्रन अश्विन

रविचंद्रन अश्विन

टीम इंडियाचा अप्रतिम स्पिनर रविचंद्रन अश्विनने (Ravichandran Ashwin)या संपुर्ण सीरिजमध्ये उत्तम कामगिरी बजावली. अश्विनने बॅालींग असो अथवा बॅटिंग दोघांमध्येही सर्वोत्तम कामगिरी केली. भारताच्या चौथ्या टेस्ट मॅचमध्ये अश्विन गेम चेंजर ठरला. या मॅचमध्ये अश्विनने 8 विकेट्स घेतले. पहिल्या डावात त्याने 3 विकेट्स, तर दुसऱ्या डावा त्याने 5 विकेट्स घेऊन इंग्लंडला पराभूत केले.

4/5

अक्षर पटेल

अक्षर पटेल

अक्षर पटेलनेही सामन्याच्या दुसर्‍या डावात 5 बळी घेऊन आपले योगदान दिले. तर अक्षरने या संपूर्ण सामन्यात इंग्लंडचे 9 गडी बाद केले. भारत जिंकण्यामागे अक्षर पटेलने महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे.

5/5

रोहित शर्मा

रोहित शर्मा

चौथ्या कसोटीच्या दुसर्‍या दिवशी जेव्हा टीम इंडिया विकेट गमावत होती तेव्हा रोहित शर्मा मैदानात इंग्लंडच्या सेने समोर येऊन उभा राहिला आणि त्याने 49 धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली. त्याला बेन स्टोक्सने एलबीडब्ल्यू केले. त्यामुळे तो आपले अर्धशतक पूर्ण करण्यात अपयशी ठरला, परंतु त्याची ही खेळी टीम इंडियासाठी महत्त्वाची ठरली.