हिममानव 'येती' घरा...

Apr 30, 2019, 16:17 PM IST
1/6

भारतीय सैन्यदगलाच्या सेवेत असणआऱ्या काही गिर्यारोकांच्या चमूला नेपाळमधील त्यांच्या एका चढाईच्या मोहिमेदरम्यान काही पाऊलखुणा आढळल्या. या मोठ्या पाऊलखुणा पाहता त्या एकतर हिममानवाच्या किंवा येतीच्या असल्याचं म्हटलं जात आहे. मंगळवारी भारतीय सैन्यदलाकडून ही माहिती देण्यात आली. (छाया सौजन्य- एएनआय)

2/6

वैज्ञनिक क्षेत्रात या साऱ्या दंतकथा असल्याचं सांगण्यात येत आहे. नेपाळी संस्कृतीमध्ये येतीचा उल्लेख बऱ्याचदा आढळतो. हा एक प्रकारचा हिममानव असल्याचं सांगण्यात आलं असून, तो उंचच उंच हिमालयाच्या बर्फाच्छादित पर्वतरांगांमध्ये असल्याचं सांगण्यात येतं. (छाया सौजन्य- एएनआय)  

3/6

@adgpi या ट्विचर अकाऊंटवरुन पोस्ट करण्यात आलेले फोटो आणि त्यासोबत लिहिलेल्या कॅप्शनमधून याविषयीची माहिती मिळाली. ३२ X १५ इंच मापाच्या या पाऊलखुणा माऊ्ंट मकालू येथील बेसकॅम्पजवळ आढळल्या. अशा प्रकारच्या पाऊलखुणा भारतीय सैन्यदलाला पहिल्यांदाच आढळल्याचीही माहिती समोर आली. मकाऊ हा जगातील सर्वात उंच पर्वतांमध्ये गणला जातो. नेपाळ आणि चीन सीमेलगत मकालू- बरून खोऱ्याजवळ तो स्थित आहे.  (छाया सौजन्य- @adgpi)

4/6

सोशल मीडियावर 'येती'च्या या पाऊलखुणांची छायाचित्र व्हायरल झाल्यानंतर एएनयआय या वृत्तसंस्थेनेही सैन्यदलांच्या सूत्रांकडून मिळालेली काही छायाचित्र प्रसिद्ध केली. त्यामुळ 'येती'विषयीच्या अनेक चर्चांना उधाण आलं आहे. (छाया सौजन्य- एएनआय)

5/6

१९२० पासून नेपाळच्या भागात गिर्यारोहणासाठी जाणाऱ्यांच्या काही गोष्टींमध्ये 'येती'चा उल्लेख आढळू लागला. २००८ मध्ये जपानी गिर्यारोहकांनी रॉयटर्स या वृत्तसंस्थेला दिलेल्या माहितीनुसार एका मोहिमेहून परतताना पश्चिम नेपाळच्या पर्वतांमध्ये त्यांना अशा प्रकारच्या पाऊलखुणा आढळल्या होत्या. ज्या 'येती'च्या असल्याचं सांगण्यात आलं होतं. (छाया सौजन्य- @adgpi)

6/6

सध्याही सैन्यदलाकडून प्रसिद्ध करण्यात आलेल्या छायाचित्रांमुळे पुन्हा 'येती'च्या पाऊलखुणा अधिक जवळून पाहण्यास मिळत आहेत. पण, हिममानवाच्या अस्तित्वाचे ठोस पुरावे मात्र मिळू शकले नाही. (छाया सौजन्य- एएनआय)