हार्दिक पांड्या- नताशाच्या कुटुंबात नव्या पाहुण्याची एंट्री

Jul 31, 2020, 07:40 AM IST
1/6

हार्दिक पांड्या- नताशाच्या कुटुंबात नव्या पाहुण्याची एंट्री

भारतीय क्रिकेट संघात अतिशय कमी वेळात आपल्या खेळीच्या बळावर लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचणाऱ्या हार्दिक पांड्या यानं आता एका नव्या जबाबदारीचा स्वीकार केला आहे. 

2/6

हार्दिक पांड्या- नताशाच्या कुटुंबात नव्या पाहुण्याची एंट्री

कोणा एका क्रिकेटच्या मैदानावर नव्हे, तर आयुष्याच्या या खेळपट्टीवर हार्दिक आता ही नवी आणि तितकीच मोठी जबाबदारी पार पाडणार आहे.   

3/6

हार्दिक पांड्या- नताशाच्या कुटुंबात नव्या पाहुण्याची एंट्री

भारतीय क्रिकेट संघातील हा स्टार खेळाडू आणि त्याची जोडीदार नताशा स्टॅन्कोविक यांच्या आयुष्यात एका नव्या पाहुण्याचं आगमन झालं आहे. 

4/6

हार्दिक पांड्या- नताशाच्या कुटुंबात नव्या पाहुण्याची एंट्री

खुद्द हार्दिकनंच सोशल मीडियावर बाळाचा एक सुरेखसा फोटो पोस्ट करत याविषयीची माहिती दिली. 

5/6

हार्दिक पांड्या- नताशाच्या कुटुंबात नव्या पाहुण्याची एंट्री

मुलाच्या येण्याचा आनंद व्यक्त करत त्यानं हा फोटो पोस्ट केला. या फोटोमध्ये त्यानं जगात नुकतंच पाऊल ठेवलेल्या आपल्या मुलाचा हात पकडल्याचं पाहायला मिळत आहे. 

6/6

हार्दिक पांड्या- नताशाच्या कुटुंबात नव्या पाहुण्याची एंट्री

हार्दिकनं सोशल मीडियाच्या माध्यमातून ही आनंदाची बातमी देताच त्याच्यावर क्रिकेट संघातील खेळाडू आणि चाहत्यांनी शुभेच्छांचा वर्षाव केला. (सर्व छायाचित्रं- हार्दिक पांड्या/ ट्विटर)