इंडोनेशिया येथील विमान अपघातात भारतीय पायलटचा मृत्यू

Oct 30, 2018, 13:16 PM IST
1/4

भारतीय पायलट भव्य सुनेजा दिवाळीला घरी येईल अशी आशा लावून बसलेल्या कुटुंबियांवर दु:खाचं डोंगर कोसळलं आहे. सुनेजाचा लॉयन एअर विमान दुर्घटनेत मृत्यू झाला आहे. इंडोनेशिया य़ेथे हे विमान समुद्रात कोसल्याने 189 प्रवाशांचा देखील मृत्यू झाल्याची माहिती आहे. जकार्ता येथून उडालेलं विमान अवघ्या 13 मिनिटातच क्रॅश झालं.

2/4

सुनेजा कुटुंबियांनी ही बातमी पाहिली तेव्हा त्यांच्यावर दु:ख कोसळलं. घराबाहेर लोकं जमा झाल्यानंतर आणि पत्रकारांनीही गर्दी केल्यानंतर एका आईचा यावर विश्वासच बसत नव्हता. सुनेजाची आई सगळ्यांना त्याच्यासाठी प्रार्थना करण्याची विनंती करत होती. आजुबाजुला राहणाऱ्या लोकांना देखील या घटनेने मोठा धक्का बसला आहे. 

3/4

नेहमी हसत राहणाऱ्या सुनेजाला आता आपण पाहू शकणार नाही अशी भावना प्रत्येकाच्या चेहऱ्यावर दिसत होती. भव्य दरवर्षी दिवाळीला घरी येत असे. पण यावर्षीची दिवाळी त्याच्या कुटुंबियावर दु:ख घेऊन आली. भव्यचे वडील गुलशन सुनेजा चार्टर्ड अकाउंटेंट आहे आणि आई एअर इंडियामध्ये मॅनेजर आहे. 

4/4

मयूर विहार येथील एहल्कोन पब्लिक स्कूलमध्ये आपलं शालेय शिक्षण पूर्ण केल्यानंतर भव्यने 2009 मध्ये फ्लाईंग लायसेंस मिळवलं.भव्यचा 2016 मध्ये विवाह झाला होता. त्यानंतर पत्नी गरिमा सेठीसोबत तो जकार्ता येथे स्थायिक झाला होता.