जयपूर ट्रिप प्लॅन करताय? मग IRCTC ची ‘ही’ खास ऑफर नक्कीच उपयोगी पडेल

Manali Sagvekar | Feb 04, 2026, 07:22 PM IST
twitter
1/8

गुलाबी शहर जयपुर

गुलाबी शहर म्हणून ओळखले जाणारे जयपुर राजस्थानमधील सर्वात मोठे शहर आहे. येथील संस्कृती आणि इतिहास अनुभवण्यासाठी देश-विदेशातून लाखो पर्यटन येत असतात. जर तुम्हीही या ठिकाणी जायचा विचार करत असाल तर, तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे.  

twitter
2/8

IRCTC चे टूर पॅकेज

IRCTC Special Tour Package For Jaipur Trip

जयपूरमध्ये अनेक प्राचीन मंदिरे आहेत त्यापैकी खाटू श्याम आणि जीण माता मंदिर हे प्रसिद्ध देवस्थान आहे. अनेकजण खाटू श्यामचे दर्शन घेण्यासाठी खास जयपुरला भेट देतात. भारतीय रेल्वे खानपान आणि पर्यटन महामंडळाने (IRCTC) टूर पॅकेज जाहिर केले आहे.   

twitter
3/8

हॉटेल, जेवण यांसारख्या सुलभ व्यवस्था

IRCTC Special Tour Package For Jaipur Trip

भारतीय रेल्वे खानपान आणि पर्यटन महामंडळाने जाहिर केलेल्या या टूर पॅकेजमध्ये पर्यटकांना अधिक सोई-सुविधांचा लाभ मिळणार आहे. ज्यामध्ये पर्यटकांना राहण्यासाठी हॉटेल, जेवण यांसारख्या सुलभ व्यवस्थांचा समावेश आहे.   

twitter
4/8

2 रात्री आणि 3 दिवसांची ट्रिप

IRCTC Special Tour Package For Jaipur Trip

हे टूरिस्ट पॅकेज मिळवण्यासाठी तुम्हाला 6660 रुपये भरावे लागणार आहेत. ही ट्रिप 2 रात्री आणि 3 दिवसांची असेल.   

twitter
5/8

खाटू श्याम जी मंदिर

IRCTC Special Tour Package For Jaipur Trip

या टूर पॅकेजमध्ये तुम्ही सिटी पॅलेस, हवा महल, जंतरमंतर, खाटू श्याम जी मंदिर आणि जीण माता मंदिराला भेट देण्याची संधी मिळेल.   

twitter
6/8

लिंकच्या मदतीने तुमची ट्रिप बुक करा

IRCTC Special Tour Package For Jaipur Trip

https://www.irctctourism.com/pacakage_description?packageCode=NJH082 तुम्ही या लिंकच्या मदतीने तुमची ट्रिप बुक करू शकता. आणि अधिक माहितीही घेऊ शकता.  

twitter
7/8

सोईप्रमाणे टूर पॅकेज निवडता येतो

IRCTC Special Tour Package For Jaipur Trip

यामध्ये तुम्ही तुमच्या सोईप्रमाणे टूर पॅकेज निवडू शकता. कुटुंबातील व्यक्तींच्या संख्येप्रमाणे, तसेच मानक, डिलक्स, लक्झरी अशा वर्गाप्रमाणे टूर पॅकेज निवडू शकता.   

twitter
8/8

पर्यटकांसाठी जयपुरचा प्रवास अधिक सोपा

IRCTC Special Tour Package For Jaipur Trip

विशेष म्हणजे 5 ते 11 अधिक पैसे देऊन अंथरुणाची सुविधाही मिळवू शकता. हे टूर पॅकेज जाहिर करून भारतीय रेल्वे खानपान आणि पर्यटन महामंडळाने इच्छुक पर्यटकांसाठी जयपुरचा प्रवास अधिक सोपा केला आहे.   

twitter